‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार यांविषयीच्या बातम्या
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विवाहित आसिफकडून हिंदु मुलीची गळा आवळून हत्या !
‘लव्ह जिहादीं’कडून प्रतिदिन हिंदु मुलींची हत्या होत असतांना एका ‘सेक्युलर’ (निधर्मी) वृत्तीच्या वृत्तवाहिन्या आणि पुरोगामी गप्प का ?
देहली – विवाहित आसिफ याने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले; मात्र तिने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आसिफने तिला फरिदाबादमधील सूरजकुंड जंगलामध्ये नेले आणि त्याने युवतीच्या मानेवर सुर्याने वार केले. त्यानंतर आसिफने ओढणीने तिचा गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी जिल्हा पोलिसांनी आसिफला अटक केली आहे.
१. मिळालेल्या माहितीप्रमाणे आसिफ बरेली जिल्ह्यातील मीरगंज भागातील हल्दीखुर्द येथे रहातो. त्याची दोन लग्ने झाली असून तो देहलीमध्ये पेंटींगची कामे करतो. जिल्हा पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी सांगितले की, एका महिलेने देशबंधू गुप्ता रोड पोलीस ठाण्यात येऊन सांगितले की, तिची २० वर्षीय मुलगी पार्क रोड, अजमल खान भागात काम करते. ती सकाळी कामावर गेली होती; परंतु ती परत आली नाही.
२. त्यानंतर पोलिसांनी मुलगी जेथे कामाला होती, तेथील ‘क्लोज सर्किट टीव्ही’चे फुटेज तपासले, तेव्हा त्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मुलगी काम आटोपून निघून गेली होती. मुलीचा कुठेही ठावठिकाणा न मिळाल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला.
३. यानंतर पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता त्यांना फरिदाबादच्या सूरजकुंड जंगलामध्ये एका युवतीचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या गळ्यावर ओढणी होती, तसेच जखमा आढळून आल्या.
४. युवती जेथे काम करायची, तेथे अन्य युवकही काम करत होते. अन्वेषणाच्या वेळी पेंटरचे काम
करणारा आसिफ त्या सायंकाळी मुलीसमवेत उपस्थित असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी आसिफच्या भ्रमणभाषचा ठावठिकाणा तपासला, तेव्हा तो मृतदेह मिळाल्याच्या
ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आसिफला अटक केली.
५. पोलीस अन्वेषणामध्ये समजले की, आसिफची युवतीशी मैत्री होती. त्याने विवाहित असल्याचे सांगितले नव्हते. त्याला युवतीशी शारीरिक संबंध ठेवायचे होते; परंतु युवतीला त्याऐवजी त्याच्याशी लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने युवतीला लग्नाविषयी बोलणी करण्यासाठी बोलावले. त्याच रात्री आसिफ युवतीला मोटरसायकलवर फरिदाबादच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे रात्रभर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आसिफने युवतीची हत्या केली आणि तो पसार झाला.
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे विवाहित धर्मांधाचा अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार !
भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कार थांबवू न शकणे, हे लोकशाहीला लज्जास्पद !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे ४ मुलांचा पिता असलेल्या विवाहित यासिन उपाख्य पप्पू याने एका अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेच्या आईने सिहानी गेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. त्या आधारावर पोलिसांनी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंद केला आहे. महिलेने सांगितले की, तिला १४ वर्षांची एक मुलगी आहे. तिच्याशी यासिनने बळजोरीने अवैध शारीरिक संबंध ठेवले.
महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पीडित मुलगी आणि आरोपी यांचे घर जवळ जवळ आहे. आरोपी पीडित मुलीला नेहमीच त्रास द्यायचा. तो पीडित मुलीच्या घरी दूरभाष करायचा. त्याने पीडित मुलीला तिच्याशी ठेवलेल्या अवैध शारीरिक संबंधांविषयी इतरांना सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपीचे वय ४५ वर्षे असून त्याच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्यासह विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
हिंदु मुलींना मुसलमान मुलांशी बोलण्यासाठी दबाव टाकणार्या धर्मांध शिक्षकाला अटक !
|
हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’ला बळी पडण्यास प्रोत्साहन देणार्या धर्मांध शिक्षकांपासून मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी सावध रहाणे आवश्यक !
शिवपुरी (मध्यप्रदेश) – शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर येथील शिकवणीवर्गाचा शिक्षक शब्बर खान हा हिंदु मुलींना मुसलमान मुलांशी परिचय करून घेण्यासाठी दबाव टाकायचा. शब्बर खान हा एक दिवस स्वत: एका अल्पवयीन मुलीसमवेत चारचाकीने फिरायला जात असतांना हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहात पकडले आणि बामौरकला पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. माध्यमांच्या माहितीप्रमाणे शब्बर महंमद खान पिछोरमध्ये एका शिकवणी वर्गामध्ये शिकवण्याचे काम करतो. गेल्या मासात एका विद्यार्थिनीने ‘शिक्षक शब्बर खान हा हिंदु मुलींना मुसलमान मुलांशी बोलण्यासाठी दबाव टाकतो’, असे तिच्या पालकांना सांगितले. तथापि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिक्षक शब्बर खानच्या या कृतीवर हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन विरोध केला. त्यावरून शब्बर खान आणि त्याच्या सहकार्यांनी विरोध करणार्या युवकांना मारहाण केली.
२. या घटनेनंतर पिछोरच्या हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि शब्बर खान समवेत त्याच्या सहकार्यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवायला लावला. त्यानंतर हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी शब्बर खानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले.
३. त्यानंतर मंचच्या कार्यकर्त्यांना शब्बर खान चारचाकीने एका अल्पवयीन मुलीसमवेत चंदेरी येथे फिरायला जात असल्याची सूचना मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी मुलीच्या नातेवाइकांना ही माहिती दिली. त्यानंतर हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी अन्य सहकार्यांसमवेत चंदेरी येथून येणार्या चारचाकींची तपासणी चालू केली. तपासणीच्या वेळी त्यांना पहिल्याच गाडीमध्ये आरोपी शब्बर खान अल्पवयीन मुलीसमवेत रंगेहात सापडला.
एटा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु मुलीला फसवून केले पलायन !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – एटा जिल्ह्यामध्ये दिलशाद उपाख्य शोहिब खान याने ‘शिवा’ या नावाने एका हिंदु तरुणीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पीडितेला ‘लव्ह जिहाद’च्या संकटातून सोडवले. पोलिसांनी मुरादाबाद येथून आरोपीला अटक केली आहे.
१. मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यामध्ये रहाणारी हिंदु तरुणी शांतीनगर येथील एका महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला शिकते. तिच्याशी मुरादाबाद जिल्ह्यातील शोहिब खान उपाख्य दिलशाद याने फेसबूकच्या माध्यमातून मैत्री केली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
२. पीडित तरुणी आपल्या जाळ्यात फसत असल्याचे पाहून आरोपीने तिचे ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) करणे चालू केले. नंतर एक दिवस पीडित तरुणी महाविद्यालयामध्ये गेली असता आरोपीने तिच्यासमवेत पलायन केले. पीडित तरुणी सायंकाळी घरी परत न आल्याने तिच्या कुटंबियांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.