‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !
साधकांना सूचना !
१५.१.२०२३ या दिवशी मकरसंक्रांत, तर २८.१.२०२३ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लास्टिकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात. वाण द्यावयाची वस्तू अधिक संख्येत विकत घ्यायची असल्यास त्याची मागणी आतापासूनच करावी लागते.
सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वाेत्तम आहेत. त्यामुळे साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
वाण देण्यासाठी समाजातून ग्रंथ वा उत्पादने यांची मागणी आल्यास साधकांनी ती स्थानिक वितरकांकडे द्यावी.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे पत्रक उपलब्ध !
‘सनातन संस्थे’च्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकात मकरसंक्रांतीचे अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व, तीळगूळ आणि वाण देण्याचे महत्त्व आदी दिले आहे. वाण देण्यास उपयुक्त होतील, असे सनातन-निर्मित लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची सूचीही या पत्रकात देण्यात आली आहे. या हस्तपत्रकासाठी प्रायोजक मिळवून त्यांचा धर्मप्रसारासाठी सुयोग्य उपयोग करावा.