‘महाभारत’ हा समाजजीवनासाठी आदर्शच आहे ! – पी.एम्. पवार

शासनकर्ते शाळा महाविद्यालयांत रामायण, महाभारत केव्हा शिकवणार ? – संपादक 

‘महाभारत’

कराड, ३ जानेवारी (वार्ता.) – ‘महाभारत’ हे समाजाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यातील प्रत्येक व्यक्तीरेखा ही आकाशाएवढी उंच आहे; मात्र प्रत्येकाने स्वतः काहीना काही तरी चुकीची गोष्ट केलेलीच आहे. केलेल्या गुन्ह्यांची परिणीती महाभारताच्या महायुद्धात झालेली दिसते. भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धात अधर्माचा नाश केला. समाजजीवन व्यवस्थित रहावे, म्हणून ‘महाभारत’ हा घालून दिलेला एक आदर्शच आहे, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक पी.एम्. पवार यांनी केले. तांबवे येथील श्री विठ्ठल मंदिरात आयोजित ‘महाभारतामधील व्यक्तीरेखा’ या विषयावर ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘महाभारत’ वाचतांना आपण त्या घटनांच्या केंद्रस्थानी आहोत आणि संपूर्ण ‘महाभारत’ आपल्याभोवती फिरते कि काय, असे आपल्याला वाटते. ‘महाभारत’ ही सुडाची भावना वाटत असली, तरी स्वत:च्या मालकीचे जे आहे, ते  मिळवण्यासाठी केलेला तो संघर्षच आहे.