गया (बिहार) येथे पिंडदान करण्यासाठी पालिका घेणार ५ रुपये शुल्क
|
गया (बिहार) – गया नगरपालिकेकडून शहरात ज्या ठिकाणी पिंडदान केले जाते, त्या ५० ‘पिंड वेदी’ येथे पिंडदान करण्यास येणार्या प्रत्येकाकडून ५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. पालिकेकडून या पिंड वेदी परिसराची स्वच्छता आणि देखभाल यांसाठी एका आस्थापनाला वार्षिक साडेपाच लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हे शुल्क वसूल करण्यात येणार आहे; मात्र या निर्णयाला येथील पुरोहित आणि त्यांची संघटना यांनी विरोध केला आहे. ‘याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
बिहार के गया में पिंड देने वाले श्रद्धालुओं से नगर निगम वसूल रहा शुल्क, पंडा समाज के विरोध के बाद मेयर ने कहा – फैसला सरकार का#Gaya #Biharhttps://t.co/Iw1P85n3Uo
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 2, 2022
१. येथील पंडा समाज आणि विष्णुपद प्रबंधकारिणी समितीने विरोध करतांना म्हटले आहे की, अशा प्रकारे पालिका शुल्क वसूल करत असतील, तर तीर्थ यात्रेकरूंच्या दृष्टीने हे पवित्र स्थान वसुलीचा अड्डा बनेल. अशा प्रकारचे शुल्क गोळा करणे, हा पैसे कमावण्याचा स्रोत बनू नये. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.
२. विष्णुपद प्रबंधकारिणी समितीचे अध्यक्ष शंभूलाल विठ्ठल यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या निर्णयामुळे लोकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. या निर्णयावर पालिका आणि प्रशासन यांनी पुनर्विचार केला पाहिजे.
३. गया नगरपालिकेने याविषयी म्हटले आहे की, पिंड वेदीतील सीताकुंड आणि अक्षयवट मंदिर या परिसरातील स्वच्छता अन् देखरेख यांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यानंतर येथे शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.