कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अत्यल्प ! – डॉ. रवि गोडसे, अमेरिका
नवी देहली – भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच अल्प आहे; कारण कोरोना किंवा ‘ओमिक्रॉन’ यांचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असली, तरी रुग्णालयात भरती होणार्यांची संख्या अत्यल्प आहे. देशभरातील रुग्णालयात रुग्ण भरती होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते, तेव्हाच ‘कोरोनाची लाट आली’, असे म्हणता येऊ शकते, अशी दिलासा देणारी माहिती अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर रवि गोडसे यांनी दिली आहे. डॉ. रवि गोडसे यांनी एक ट्वीट केले असून ‘काय करावे आणि काय करू नये’, याविषयीची माहितीही दिली आहे. डॉ. रवि गोडसे यांनी काही दिवसांपूर्वीच ‘ओमिक्रॉन म्हणजे खुळचटपणा !’ असे ट्वीट केले होते. आता त्यांनी ‘ओमिक्रॉन ही डेल्टा प्रकारासाठी वाईट बातमी आहे’, असे ट्वीट केले आहे.
ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी चाचणी करुच नये, असे डॉ. रवी गोडसे यांनी म्हटले आहे. #RaviGodse #OmicronVariant https://t.co/i5Hyl944KL
— Lokmat (@lokmat) January 3, 2022
डॉ. गोडसे म्हणाले की,
१. बर्याच जणांना जरी कोरोना किंवा ‘ओमिक्रॉन’ची लागण झाली, तरी त्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी चाचणी करूच नये.
२. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. तरीही लसीकरणावर आणखी भर देण्याची आवश्यकता आहे. ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना ओमिक्रॉनमुळे गंभीर आजारी होण्याचा धोका ६० टक्क्यांनी अल्प असतो, तर ज्यांनी ३ डोस घेतले आहेत, त्यांना ८१ टक्क्यांनी धोका अल्प असतो.