पर्यावरण प्रदूषणविरहित करण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक असणार ! –  आदित्य ठाकरे

मुंबई – वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक असणार आहेत, अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २ जानेवारी या दिवशी येथे केली.

हा निर्णय यापूर्वीच राज्यशासनाने घेतला होता. या निर्णयाची कार्यवाही १ एप्रिल २०२२ ऐवजी १ जानेवारी २०२२ पासून होणार आहे, असेही ट्वीट त्यांनी केले आहे.