कथन करते श्री गुरुगाथा !
पनवेल (रायगड) येथील सौ. प्रेमलता मोने यांनी श्रीगुरूंविषयी केलेले काव्य देत आहोत.
श्री गुरुचरणी ठेवूनिया माथा ।
आरंभ करते श्री गुरुगाथा ।। १ ।।
काय वर्णू ‘गुरुकृपायोग’ असे न्यारा ।
सनातनरूपात वसे श्री गुरुराया (टीप १) ।। २ ।।
योगियांचा राजा माझे गुरुराया ।
सनातनरूपी माझे श्री गुरुराया ।। ३ ।।
सकल जनांचा उद्धार कराया ।
भूवरी अवतरले गुरुरूपी रामराया ।। ४ ।।
रक्षण्या आम्हा साधक जीवांना ।
उद्धरी योगीराज सकल सृष्टीला ।। ५ ।।
गुरु पादुका माझ्या अंतरात राही ।
परि माझी माऊली रामनाथीत (टीप २) राही ।। ६ ।।
श्री गुरुचरणी ठेवूनिया माथा ।
कथन करिली श्री गुरुगाथा ।। ७ ।।
क्षमायाचना करते तुझिया चरणी ।
ठेवूनिया माथा श्री गुरुचरणी, सद्गुरुचरणी ।। ८।।
टीप १ : श्री गुरुराया – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ : सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात
– सौ. प्रेमलता नीलेश मोने, पनवेल, रायगड. (१८.८.२०२१)