पू. लक्ष्मण गोरे यांचा संतसन्मान सोहळा चालू असतांना सूक्ष्मातील युद्ध चालू असण्याविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे
‘५.१२.२०२१ या दिवशी आम्हाला ‘उद्या रामनाथी आश्रमात यायचे आहे’, असा निरोप मिळाला. त्यानंतर माझा शारीरिक त्रास पुष्कळ वाढला. प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी गेल्यावर ‘तिथे सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे मला जाणवले. पू. गोरेआजोबांचे छायाचित्र ठेवलेल्या पांढर्या लखोट्यासंदर्भातील प्रयोग झाल्यावर ‘लखोट्यातील चैतन्यामुळे युद्ध संपले आणि सर्वत्र हलकेपणा पसरला’, असे मला जाणवले.
सनातनच्या सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी सूक्ष्म परीक्षणात ‘या छायाचित्रावर सूक्ष्मातून अनेक अनिष्ट शक्ती आक्रमणे करत आहेत; परंतु छायाचित्रातून श्रीदुर्गादेवीची मारक शक्ती वातावरणात प्रक्षेपित होऊन सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे सांगितले. तेव्हा मला आदल्या दिवसापासून जाणवत असलेल्या सूक्ष्मातील युद्धाचा उलगडा झाला.’
– श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (पू. गोरेआजोबांचे जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२१)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |