उत्कट राष्ट्र आणि धर्म प्रेमी असलेले पू. लक्ष्मण गोरे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर झाले सनातनमय !
‘पू. लक्ष्मण गोरेकाका यांचा पूर्वी मला सहवास लाभला. त्या वेळी मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. मला त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होणे
पू. लक्ष्मण गोरे यांच्याशी माझा परिचय मी मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करत असतांना आला. ते प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि एका मोठ्या हिंदु संघटनेत कार्य करत असल्याने त्यांच्या अनेक हिंदुत्वनिष्ठांशी ओळखी होत्या. हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी मी त्यांच्या समवेत अनेक मान्यवर हिंदुत्वनिष्ठांना भेटलो. अशा रितीने पू. गोरेकाका यांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात
सहभाग होता.
२. श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती श्रद्धा आणि भाव असलेले पू. लक्ष्मण गोरे !
त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती उत्कट प्रेम वाटत असल्याने देवाने त्यांना सनातन संस्थेत आणले. त्यांनी स्वतः साधना आणि सेवा करून संपूर्ण कुटुंबाला साधना करण्यासाठी साहाय्य केले. एका मोठ्या संघटनेत कार्य करत असतांना ते ‘सनातन’मय होऊन साधनेत टिकून राहिले. त्यांचे नाव ‘लक्ष्मण’ असून त्यांनी श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना हृदय सिंहासनी बसवले आहे. हे केवळ ‘त्यांच्यातील गुरूंप्रतीची श्रद्धा आणि भाव यांमुळे झाले’, असे वाटते.
३. प्रत्येक जिवाचा उद्धार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
पू. गोरेकाका संत झाल्याचे वृत्त समजल्यावर मला आश्चर्य वाटून आनंद झाला. काही वर्षांपूर्वी ‘पू. गोरेकाका संत होतील’, असे कुणाला वाटले नसेल; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यावर कृपा करून त्यांना संतपदापर्यंत पोचवले. पू. गोरेकाका यांच्या उदाहरणावरून म्हणावेसे वाटते,
‘जो जो सनातनच्या छायाछत्राखाली आला ।
तो तो ‘गुरुकृपायोग’ साधनेने पावन झाला ।। १ ।।
जो जो श्रद्धेने श्री गुरुचरणी स्थिरावला ।
तो तो परात्पर गुरु डॉक्टरांनी उद्धरियेला ।। २ ।।’
‘पू. गोरेकाका यांची अशीच आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी प्रार्थना आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
-(पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.१२.२०२१)