ग्रामीण बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर
पेण, जिल्हा रायगड, २ जानेवारी (वार्ता.) – येथील महाडीकवाडी विभागात ग्रामीण बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ५० जणांनी या शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी सहभाग घेतला. अलीबाग येथील शासकीय रक्तकेंद्रांकडून रक्तदात्यांना सन्मानपत्र देण्यात आले. शिबिरात असोसिएशनचे उपाध्यक्ष दर्शन वाडकर आणि विक्रम माळी हे उपस्थित होते. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी उपस्थित सर्व संघातील युवकांना असोसिएशनच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवण्यासाठी आपला सहभाग असावा, आपण असेच समाजकार्य करूयात, असे आवाहन केले.