घरोघरी आयुर्वेद
आंबवलेल्या पदार्थाविषयी माहिती
काही ठराविक रुग्णांना ‘आंबवलेले पदार्थ टाळा’, असे सांगतांनाच ‘एक वेळ डोसा चालेल; पण इडली नको’, असे म्हटले जाते. असे का ?; कारण
१. डोसा करतांना भाजण्याची, तर इडली करतांना उकडण्याची प्रक्रिया होते. पहिल्या प्रक्रियेत, म्हणजेच डोसे करण्यामध्ये अधिक अग्नीसंस्कार होत असल्याने तुलनेत पचायला हलकेपणा येतो.
२. डोसा करतांना पिठाची मात्रा तुलनेत न्यून लागते. (अर्थातच हे आकार आणि संख्या यांवरही अवलंबून आहे.)
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.