महिलांवर अत्याचार करणे हा भगवंताचा अवमान ! – पोप फ्रान्सिस
आमीष दाखवून गरीब आणि आदिवासी यांचे धर्मांतर करणे, त्यांची नंतर फसवणूक करणे, कॉन्व्हेंट शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यास रोखणे, हाही भगवंताचाच अवमान आहे, असे पोप फ्रान्सिस कधी बोलणार अन् ख्रिस्ती मिशनर्यांना असे करण्यापासून कधी रोखणार ? – संपादक
व्हॅटिकन सिटी – महिलांवर अत्याचार करणे हा ईश्वराचा अवमान आहे. आई जीवन देते. महिला जगाला एकत्र ठेवतात. महिलांना कोणत्याही प्रकारे त्रास देणे थेट भगवंताचा अवमान करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे ख्रिस्ती नववर्षाच्या शुभेच्छा देतांना केले. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमध्ये महिलांवरील अत्याचारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यावरून त्यांनी वरील विधान केले. पोप फ्रान्सिस यांनी यापूर्वीही महिला आणि मुले यांच्याविषयीची हिंसा रोखण्याविषयी आवाहन केलेले आहे.
Pope Francis has pleaded for an end to violence against women. “Enough,” he said. “To hurt a woman is to insult God, who from a woman took on our humanity.”https://t.co/IkytruEJAp #Catholic #HappyNewYear
— The Tablet (@The_Tablet) January 2, 2022