(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या भडकाऊ विधानांचा निषेध करावा !’
|
|
नवी देहली – हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी हरिद्वार, रायपूर आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये मुसलमानांविषयी द्वेष पसरवणारी विधाने केली आहेत. हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्या अशा भडकाऊ वक्तव्यांचा जाहीर निषेध करावा, तसेच दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, असे पत्र ५ माजी नौदल आणि वायूदल प्रमुख यांच्यासह १०० मान्यवरांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. यांमध्ये माजी नौदलप्रमुख एल्. रामदास, विष्णु भागवत, अरुण प्रकाश, आर्.के. धोवान; माजी वायूदलप्रमुख एस्.पी. त्यागी, तसेच माजी सनदी अधिकारी, पत्रकार, अधिवक्ता, अर्थतज्ञ आदींचाही समावेश आहे.
5-member SIT to probe Haridwar Dharma Sansad ‘hate speech’ case https://t.co/BkCclE36Dj
— TOI India (@TOIIndiaNews) January 2, 2022
या पत्रात म्हटले आहे की,
१. हरिद्वार येथे झालेल्या ३ दिवसीय धर्मसंसदेत हिंदुत्वनिष्ठ नेते आणि साधू-संत यांनी जी प्रक्षोभक भाषणे केली, त्याचा आम्ही निषेध करतो. या नेत्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असून ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हत्यारे बाळगा’, ‘हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट समुदायाचे शिरकाण करा’, अशी वक्तव्ये केली.
२. ‘म्यानमारप्रमाणे पोलीस, सैन्य आणि प्रत्येक हिंदु यांनी हत्यारे बाळगावीत अन् एका समुदायाचा नरसंहार करावा’, असे उद्गार हिंदु रक्षा सेनेचे स्वामी प्रबोधानंद यांनी धर्मसंसदेत काढले होते.
३. देशाच्या सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. अशा स्थितीत देशात काही मंडळी करत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांमुळे बाह्य शक्तींना हातात आयते कोलीत मिळू शकेल. पोलीस असो वा सैन्य त्यांच्यामध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेला चिथावणीखोर भाषणांमुळे तडा जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रकारांकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.