ओरोस येथे पेट्रोलपंप लुटून पसार झालेल्या घाटकोपर (मुंबई) येथील ५ जणांना पकडण्यात पोलिसांना यश
वैभववाडी – मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे सिद्धी पेट्रोलपंपावर चोरी करून पळणार्या ५ जणांना करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी कह्यात घेतले. हे सर्व आरोपी घाटकोपर (मुंबई) येथील असून त्यांच्याकडून ५७ सहस्र रुपये रोख रक्कम आणि ३० भ्रमणभाष संच पोलिसांना सापडले.
१ जानेवारी या दिवशी सकाळी ६ वाजता सिद्धी पेट्रोलपंपावर या ५ जणांनी चोरी केली आणि तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना याविषयी माहिती कळवली. त्यानंतर सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. तालुक्यातील करूळ पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी एक चारचाकी गाडी तपासणीसाठी थांबवली. गाडीची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम आणि भ्रमणभाष संच पोलिसांना सापडले.