सातारा येथे मद्यप्राशन करून वाहन चालवणार्या १२ जणांवर गुन्हे नोंद !
अशा मद्यपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. – संपादक
सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबर या दिवशी नववर्ष स्वागतासाठी मद्यप्राशन करून वाहने चालवली जातात. याचा पूर्वानुभव लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने पोलीस पथके निर्माण केली गेली. या पथकांच्या माध्यमातून मद्यप्राशन करून वाहन चालवणार्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२ जण आढळून आले. त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.