सोलापूर येथे ३५ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !
३ धर्मांधांवर गुन्हा नोंद
सोलापूर – येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले. या प्रकरणी इब्राहिम कुरेशी, आलम इब्राहिम कुरेशी, काल्या महंमद साब कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशियांना डांबून ठेवण्यात आले होते, तसेच यामध्ये नुकतेच जन्मलेले ३ दिवसांचे गाईचे वासरूही होते. (गोवंशियांना डांबून ठेवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. प्रत्येक वेळी गोवंशियांची हत्या करण्यामध्ये धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्यायला हवे. गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू केला आहे. या कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नाही, हेच उघड होत असलेल्या या घटनांमधून दिसते. त्यामुळे कायद्याची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे. – संपादक)
३१ डिसेंबर २०२१ च्या पहाटे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर बझार पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी डांबून ठेवलेल्या गोवंशियांची स्थिती पाहून पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी स्वतः गोवंशियांना औषधोपचार करण्यासाठी साहाय्य केले. या सर्व गोवंशियांना बार्शी रस्त्यावरील अहिंसा गोशाळेमध्ये सोडण्यात आले.