राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २.१.२०२२
खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे कांगावखोर विधान
|
‘जे कुणी लोकांचे धर्मांतर करत आहेत ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाहीत. एखाद्याचे चांगले काम आणि त्या धर्मातील व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास प्रभावित करते. भेदभाव न करता मानवतेची सेवा करण्यास मिळावी, यासाठी एखाद्या विशिष्ट धर्मात लोक धर्मांतर करतात’, असे फुकाचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू–काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी उधमपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करतांना केले. कर्नाटकमध्ये संमत करण्यात आलेल्या धर्मांतरविरोधी विधेयकाविषयी ते बोलत होते.’
विविध उपाययोजनांनंतरही महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांत वाढ !
विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नांतून महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचारांची विदारक स्थिती उघड !
‘महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कठोर कारवाईविषयी ‘शक्ती’ विधेयक एकमताने संमत करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी यापूर्वीही अनेक कायदे आणि योजना महाराष्ट्रात असूनही महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. (कठोर कायदे असूनही त्याची कार्यवाही का होत नाही ? याचा सरकारी यंत्रणांनी विचार करयला हवा ! – संपादक) विधीमंडळांत उपस्थित झालेल्या महिलांवरील अत्याचारांविषयीच्या प्रश्नांतून महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांची भयानक स्थिती समोर आली. अन्य राज्यांच्या तुलनेत भलेही ही स्थिती अल्प असू शकेल; मात्र राज्यातील महिलांवरील अत्याचारांचे हे वाढते प्रमाण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे.
महिलांवरील अत्याचारांच्या काही गंभीर घटना
अ. संभाजीनगर येथे जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत बलात्काराच्या १६३ घटना घडल्या, तर १९७ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या.
आ. बीडमध्ये वर्ष २०२० मध्ये बलात्काराचे १२९, तर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ८५ गुन्हे नोंद झाले आहेत.
इ. जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत मुंबईच्या लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बलात्काराच्या १८ घटना घडल्या आहेत.’
हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ ‘मनुस्मृती’चे हिंदुद्रोह्यांकडून दहन !
मनुस्मृतीच्या विरोधात आणि त्याच्या समर्थनार्थ ट्विटरवर ‘ट्रेंड’ !
‘२५ डिसेंबर २०२१ या दिवशी ‘मनुस्मृति दहन दिवस’ या नावाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा दिवस साजरा करण्याचे काही हिंदुद्रोह्यांनी आवाहन केले. यामध्ये ‘बीबीसी हिंदी’च्या माजी पत्रकार मीना कोतवाल यांनी मनुस्मृतीचे दहन करून त्याचा व्हिडिओ ट्विटरद्वारे प्रसारित केला आणि समाजाला मनुस्मृति जाळण्याचे प्रक्षोभक आवाहन केले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘मी आज ज्या प्रकारे मनुस्मृतीचे दहन केले, तसे तुम्ही केले का ? असे करण्यात पुष्कळ मजा आहे. आता आपण असे नियमित करत जाऊ आणि केवळ तिचे दहन न करता तिच्यातील विचारांनाही नष्ट करून टाकू. बाबासाहेब (आंबेडकर) यांनीही हेच केले होते.’
अवैध पशूवधगृहे उद्ध्वस्त करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आंदोलनामुळे ४ पशूवधगृहे त्वरित ‘सील’ !
|
|
‘संगमनेर (जिल्हा नगर) शहरात मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जात आहे. शहरातील जमजम कॉलनी आणि परिसरात खुलेआम अवैध पशूवधगृहे चालवली जातात. ही पशूवधगृहे बंद करावीत आणि सराईत गुन्हेगारांना तडीपार करावे, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ४.१०.२०२१ या दिवशी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री विलंबाने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी रात्री साडेदहा वाजता शहरातील ४ पशूवधगृहे ‘सील’ केली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या दुर्लक्षामुळेच शहरात अवैध पशूवधगृह चालू असल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्यांनी म्हटले आहे.’