नसीरुद्दीन शाह भयग्रस्त का ?
संपादकीय
मोगलांचा उदो उदो करणाऱ्या धर्मांधांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित !
‘दवायर’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये धर्मांध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ‘भारतात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही रातोरात नष्ट करू शकत नाही. आम्ही २० कोटी भारतातीलच आहोत. आमच्या पिढ्या येथेच जन्माला आल्या आणि येथेच मरण पावल्या. आम्ही या विरोधात लढा देऊ’, असे चितावणीखोर वक्तव्य केले. मुसलमानांनी भारतात येऊन राष्ट्रनिर्मितीचे कार्य केल्याची टिमकीही त्यांनी वाजवली. हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेमधील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्यावरून शाह यांनी हिंदूंना थेट लढण्याची धमकी दिली. या देशावर ज्यांनी आक्रमण केले त्या मोगलांच्या वंशजांपैकीच शाह हे आहेत. शाह चित्रपटसृष्टीत वावरतांना इतक्या वर्षांत त्यांना मुसलमान म्हणून कुणीही लाथाडले नाही, उलट त्यांना नावलौकिक मिळाला; मग ही अचानक हिंदूंना धमकी देण्याची मजल शाह यांनी का गाठली ? ज्यांना देशात आश्रय देऊन अल्पसंख्य म्हणून सवलतींची खैरातही दिली, त्याविषयी कृतज्ञता दूर राहिली, ते हिंदूंचाच गळा चिरण्याची भाषा का करत आहेत ? धोका कुणाला कुणामुळे आहे, याचा हिंदूंनीच आता विचार करायची वेळ आली आहे.
हिंदू धर्मांध नव्हेत, तर सहिष्णुच !
शाह यांच्या पूर्वजांनी हिंदूंची वर्षांनुवर्षे प्राचीन असलेली संस्कृती उद्ध्वस्त केली. मथुरा, काशी येथील मंदिरांसह सहस्रावधी मंदिरांचा विध्वंस केला. नालंदा, तक्षशीला आदी विद्यापिठांतील ग्रंथसंपदा नष्ट केली. मग कुणी कुणाला धमकी द्यायला हवी होती ? मोगलांचे अनन्वित अत्याचार विसरून हिंदूंनी ज्या समुदायाला आश्रय दिला, त्याच्यावर हिंदूंनी अत्याचार केल्याचे एकतरी उदाहरण शाह देऊ शकतील का ? इतके अत्याचार सोसून जर हिंदूंनी बाबराने पाडलेल्या एका श्रीराममंदिराची पुनर्उभारणी केली, पुन्हा आपल्या संस्कृतीचे संवर्धन करणारे राष्ट्र घडवण्याची मागणी केली, तर त्यांना ‘धर्मांध’ ठरवायला निघालेल्या शाह यांचे वक्तव्य म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत. मोगल, इंग्रज यांच्यानंतर काँग्रेसनेही हिंदूंची गळचेपी चालूच ठेवली. आता कुठे मोदी शासनाच्या काळात हिंदूंना ‘स्वत:च्या संस्कृतीचा उत्कर्ष होईल’, अशी आशा वाटायला लागली, तर शाह यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? शाह जर धर्मनिरपेक्ष असते, तर त्यांनी मोगलांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पुन्हा उभारण्याची मागणी केली असती; मात्र तसे न करणारे शाह हे धर्मनिरपेक्ष नाहीत, तर कट्टर धर्मांध आहेत. हिंदूंच्या सहिष्णुतेची जाणीव नसलेलाच त्यांना धमकी देण्याची भाषा करू शकतो.
ज्या वेळी काश्मीरमधील साडेचार लाख हिंदूंना तेथील धर्मांधांनी निर्वासित केले, त्या वेळी शाह भारतातच होते. मागील ३० वर्षांहून अधिक काळ काश्मिरी हिंदु भारतातच निर्वासितांचे जीवन जगत आहेत. त्यांच्यावर धर्मांधांनी अत्याचार केले आणि त्या काळात त्यांची सुरक्षितता धोक्यात आली. शाह यांना हे का दिसले नाही ? धर्मांध मुसलमानांनी सहस्रावधी हिंदु स्त्रियांवर बलात्कार केले, हिंदूंची निर्घृण हत्या केली. भारतात असा पाशवी अत्याचार हिंदूंनी मुसलमानांवर केला आहे का ? कोणत्याही अन्य धर्माची तत्त्वे आपल्या विरोधात असली, तरी हिंदूंनी कधीही तलवारीच्या जोरावर इतरांवर धर्म लादला नाही; मात्र हिंदूंच्या याच सहिष्णुतेमुळे नसीरुद्दीन शाह त्याचा अपलाभ घेत आहेत.
हिंदू जागृत झाल्यामुळे धर्मांध अस्वस्थ !
‘औरंगजेब याची अपकीर्ती करण्यात आली’, येथपर्यंत बोलण्याची शाह यांची मजल गेली. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंनी आणखी किती सहन करावे ? ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाने हिंदूंचा वंशविच्छेद केला, ज्याने हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली, ज्याने स्वत:च्या राज्यात शरीयत कायदा लागू करून अन्य धर्मियांसाठी जिझिया कर लागू केला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरिराचे तुकडे करून त्यांची विटंबना केली, त्याचा उदो उदो शाह करत असतील, तर हिंदूंनी ते का सहन करायचे ? औरंगजेबाने मरेपर्यंत हिंदवी स्वराज्याला विरोध केला. या इतिहासाच्या खुणा आजही आहेत. सध्या हिंदू त्यांच्यावर, तसेच त्यांच्या पूर्वजांवर झालेल्या अत्याचारांविषयी उघडपणे बोलतात. ही जागृतीच शाह यांच्यासारख्या धर्मांधांना खुपते, असे समजायचे का ? हिंदू जागृत होत असल्यामुळेच शाह यांना भारतात असुरक्षितता वाटत आहे का ? भारत इस्लामिक राष्ट्र झाले की, त्यांना सुरक्षितता वाटेल का ? जागृत हिंदू मात्र हे कधीही होऊ देणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राष्ट्रप्रेमी मुसलमानही सुरक्षित होते. ज्यांच्या मनात या भूमीला ‘दार-उल्-इस्लाम’ (इस्लामी शासन) करायचे कपट नाही आणि जे या भारतातील संस्कृतीला आपली संस्कृती मानतात, त्यांना भीती वाटण्याचे मुळीच कारण नाही. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या धर्माचा हिंदूंना कधीही अडथळा वाटला नाही. नसीरुद्दीन शाह हेही एक यशस्वी अभिनेते आहेत; मात्र हिंदुद्वेषाने ग्रासल्यामुळे त्यांना ही भूमी असुरक्षित वाटत आहे. फाळणीनंतर इस्लाम हा पाकिस्तानचा अधिकृत धर्म झाला; मात्र भारतात भोळ्या हिंदूंनी ‘अन्य पंथियांना असुरक्षित वाटू नये’, यासाठी स्वत:चे हिंदुत्व पणाला लावून धर्मनिरपेक्षता स्वीकारली. अशा त्यागाचे उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेही पहायला मिळणार नाही; मात्र यापुढे अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंना पेलवणारी नाही. ‘या धर्मनिरपेक्षतेमुळे आपला घात झाला आहे’, हे हिंदूंनी ओळखले आहे. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेऊन आज शाह हिंदूंनाच धमकी देत आहेत. आज धमकी देणारे धर्मांध हिंदूंच्या विरोधात कृतीही करतील. त्यामुळे हिंदूंनी सर्वधर्मसमभावाच्या पेचात न अडकता हिंदूंचे हित साधणारे हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हेच हिताचे ठरते !