‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’च्या अनियमित कारभाराविषयी योग्य ती कायदेशीर कारवाई होणार ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी
कोल्हापूर, १ जानेवारी (वार्ता.) – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशी चालू आहे. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी काही अनियमितता लक्षात आणून दिल्यावर अधिक चौकशी केली असता काही तथ्य लक्षात आले. या संदर्भात शासकीय स्तरावर प्रक्रिया चालू असून लवकरच योग्य कायदेशीर कारवाईही होईल, असे आश्वासन कोल्हापूचे जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांनी दिले. श्री महालक्ष्मी भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत यांच्या समवेत शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्यांसमवेत १६ सप्टेंबर २०२१ या दिवशी बैठक झाली होती. त्या संदर्भात पुढील कृती काय होणार ? याची माहिती हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना ३१ डिसेंबर या दिवशी विचारल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.
या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
श्री. प्रमोद सावंत आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी उपस्थित केलेली काही सूत्रे
१. देवस्थान समितीने १२ कोटी रुपयांचा खासगी भूमी खरेदीचा प्रस्ताव दिला होता. याच समवेत भूविकास बँकेच्या असलेल्या भूमीच्या खरेदीचा प्रस्तावही दिला होता. हा प्रस्ताव अव्यवहार्य आहे.
२. अपना बँकेच्या भाडेतत्त्वावरील जागेच्या नूतनीकरणाच्या संदर्भात झालेल्या सर्व खर्चाची ‘इस्टिमेट’ पडताळणी व्हावी आणि चौकशी व्हावी.
३. देवस्थान समिती कार्यालय, श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिर या ठिकाणी सेवायोजना कार्यालयाच्या अनुमतीविना, तसेच स्थानिक वृत्तपत्रात घोषित न करता भरती करण्यात आली आहे. ही भरती रहित करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली होती.
४. श्री महालक्ष्मी मंदिर हे अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असलेले आहे. तरी पर्यटनवाढीसाठी आणि मंदिराच्या उत्पन्नातून येणार्या निधीतून भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यात याव्यात. देवस्थानचा निधी हा केवळ मंदिर सुविधांसाठीच वापरण्यात यावा.