६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

अंत्यविधीविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या अंत्यविधीच्या संदर्भात केलेले संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे पार्थिवाची केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सर्वसाधारण व्यक्ती मृत पावते, तेव्हा तिच्या पार्थिवातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे वातावरण दूषित होते. याउलट आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेल्या व्यक्तीचे देहावसान होते, तेव्हा तिच्या पार्थिवातून चैतन्य प्रक्षेपित होऊन वातावरण चैतन्यमय बनते. याचाच प्रत्यय आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेल्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवाच्या संदर्भात आला. १८.१०.२०२१ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात त्यांचे देहावसान झाले. आश्रमातील संत आणि साधक यांना त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्या. त्यांच्या पार्थिवातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे सर्वांना जाणवले.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे पार्थिव, त्यांची चिता आणि त्यांच्या अस्थी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि आध्यात्मिक विश्लेषण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

_______________________________

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचण्यांत कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाची छायाचित्रे, त्यांच्या चितेचे छायाचित्र आणि मंत्राग्निचा धूर, तसेच त्यांच्या अस्थी यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

१ अ. कै. (सौ.) प्रमिला केसरकर आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असल्यामुळे त्यांच्या पार्थिवातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे : कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाच्या छायाचित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

१ अ १. विश्लेषण : कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे १८.१०.२०२१ या दिवशी देहावसान झाले. तेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असल्यामुळे त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. दुसर्‍या दिवशी (१९.१०.२०२१ या दिवशी) त्यांच्या अंत्यविधीचा आरंभ होण्यापूर्वीही त्यांच्या पार्थिवाच्या छायाचित्रामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली. अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या पार्थिवाला गोपीचंदनादी लेपन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवातून (छायाचित्रातून) प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात आणखी वाढ झाली. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेला हार त्यांच्या पार्थिवाला घातल्यानंतर त्यांच्या पार्थिवातून (छायाचित्रातून) प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात आणखी वाढ झाली.

सौ. मधुरा कर्वे

१ आ. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या चितेच्या छायाचित्रामध्ये आणि मंत्राग्नीच्या धुरामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे : कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आले. तेव्हा तेथे समाजातील एका स्त्रीचे पार्थिव दहन करण्यात येते होते. तुलनेसाठी म्हणून तिच्या चितेचे छायाचित्र आणि तिच्या भडाग्नीचा (अर्थ – मंत्र न म्हणता केले जाणारे दहन) धूर यांचीही परीक्षणे करण्यात आली. या परीक्षणांतून त्या स्त्रीच्या चितेच्या छायाचित्रामध्ये आणि भडाग्नीच्या धुरामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले. याउलट कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या चितेच्या छायाचित्रामध्ये आणि मंत्राग्नीच्या धुरामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या सारणीत दिले आहे.

१ आ १. विश्लेषण : सर्वसाधारण व्यक्तीमध्ये रज-तमाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मृत्यूनंतर तिच्या पार्थिवातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या चितेच्या छायाचित्रामध्ये आणि मंत्राग्नीच्या धुरामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या साधनेमुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या चैतन्याचा हा परिणाम आहे.

१ इ. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या अस्थींमधून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे : कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या अस्थींमध्येही नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या अस्थींतील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण उत्तरोत्तर अधिक आहे.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे गोपीचंदनादी लेपन केल्यानंतरचे छायाचित्र
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेला हार पार्थिवाला घातल्यानंतरचे छायाचित्र
कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या चितेला मंत्राग्नी दिल्याचे छायाचित्र

२. विश्लेषण

थोडक्यात साधनेमुळे व्यक्तीमध्ये एवढी सात्त्विकता निर्माण होते की, अंतसमयीही (मृत्यूच्या वेळी) तिच्या पार्थिवातून, एवढेच नव्हे तर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिच्या अस्थींमधूनही पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होते. यातून साधनेचे महत्त्व अधोरेखित होते.’ (मृत्यूत्तर व्यक्तीला पुढची गती मिळावी यासाठी हिंदु धर्मात काही विधी करण्यास सांगितले आहेत. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या ९ व्या, १० व्या आणि १२ व्या दिवशी केलेल्या विधींच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन वर चौकटीत दिलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’ संकेतस्थळाच्या लिंकवर प्रसिद्ध केले आहे.)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.११.२०२१) ई-मेल : mav.research2014@gmail.com


कु. मधुरा भोसले

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या देहातील विविध भागांच्या अस्थींमध्ये विविध प्रमाणात सकारात्मक ऊर्जा जाणवण्यामागील अध्यात्मशास्त्र

१. डोक्यापासून मानेपर्यंतच्या अस्थी : ‘कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे मृत्यूसमयीही भगवंताशी अखंड अनुसंधान होते. त्यामुळे त्यांच्या डोक्यापासून मानेपर्यंतच्या भागामध्ये वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावरील सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याची स्पंदने सूक्ष्मतम स्तरावर कार्यरत झाली होती. ‘यू.ए.एस्.’ उपकरणामध्ये सूक्ष्म स्तरावरील स्पंदने मोजण्याची क्षमता आहे; परंतु त्यामध्ये सूक्ष्मतम स्तरांवरील स्पंदने अल्प प्रमाणात मोजता येतात. त्यामुळे या उपकरणाला वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावरील सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याची सूक्ष्मतम स्पंदने अधिक प्रमाणात मोजता न आल्यामुळे कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या डोक्यापासून मानेपर्यंतच्या अस्थींतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ केवळ ५१.४० मीटर इतकी आढळली.

२. छातीपासून कटी (कमरे)पर्यंतच्या अस्थी : कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या देहाचे दुखणे न्यून करण्यासाठी त्या नामजप करत असतांना नामजपातील चैतन्य त्यांच्या छातीपासून कटीपर्यंतच्या भागामध्ये वायु आणि तेज या तत्त्वांच्या स्तरांवरील सगुण-निर्गुण चैतन्याची सूक्ष्मतर स्तरावर स्पंदने कार्यरत झाली होती. ‘यू.ए.एस्.’ उपकरणामध्ये सूक्ष्म स्तरावरील स्पंदने मोजण्याची क्षमता आहे; परंतु त्यामध्ये सूक्ष्मतर स्तरावरील स्पंदने मध्यम प्रमाणात मोजता येतात. त्यामुळे या उपकरणाला तेज तत्त्वाच्या स्तरावरील सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याची सूक्ष्मतर स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात मोजता न आल्यामुळे कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या छातीपासून कटीपर्यंतच्या अस्थींतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ केवळ ८३.८० मीटर इतकी आढळली.

३. कटीपासून पायांपर्यंतच्या अस्थी : कै. केसरकाकूंना मृत्यूचे वेध लागल्यावर त्यांच्या मृतदेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाताळातून वाईट शक्ती सतत त्यांच्या पायांवर आक्रमणे करत होत्या. तेव्हा केसरकरकाकूंच्या मृत्यूसमयी वाईट शक्तींशी लढण्यासाठी त्यांच्या कटीपासून पायापर्यंत पुष्कळ प्रमाणात देवाची मारक शक्ती कार्यरत होऊन ती त्यांच्या पायांच्या बोटांवाटे वातावरणात प्रक्षेपित झाली. ही मारक शक्ती तेजतत्त्वाच्या सगुण आणि सूक्ष्म स्तरांवर कार्यरत झाली होती. त्यामुळे ‘यू.ए.एस्.’ उपकरणामध्ये सूक्ष्म स्तरावरील स्पंदने मोजण्याची क्षमता असल्यामुळे ही स्पंदने अधिक प्रमाणात मोजता आली. त्यामुळे कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या कटीपासून पायांपर्यंतच्या अस्थींतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १०१.३० मीटर इतकी आढळली.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२१)

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’त करण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या मृत्यूत्तर विधींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे विधींच्या वेळी विधींचा कर्ता (श्री. रामदास केसरकर), विधींचे पुरोहित (श्री. ईशान जोशी) आणि विधींतील अन्य घटक यांचे केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’त अशा विषयाचेही संशोधन केले जाते, हे कळावे, यासाठी जागेअभावी येथे संशोधनाचा केवळ मथळा दिला आहे.

हा लेख दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पुढील मार्गिकेवर वाचा bit.ly/3HxfXah