बेळगाव येथे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकार्यांना निवेदन !
बेळगाव, १ जानेवारी (वार्ता.) – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखण्याविषयी शिक्षणाधिकारी रामचंद्र मुदगणवर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. सदानंद मासेकर, श्रीराम सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. बाळू कुरबर आणि कार्यकर्ते श्री. विनोद पाटील, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर आणि सौ. उज्वला गावडे आदी उपस्थित होते.
बेळगाव येथील ‘वेणुध्वनी’ आकाशवाणी केंद्रावर नववर्ष १ जानेवारीला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी प्रबोधन !
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. ज्योती दाभोलकर यांनी ‘वेणुध्वनी’ या आकाशवाणी केंद्रावर हिंदु धर्माचे महत्त्व सांगून नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी जनतेचे प्रबोधन केले. आकाशवाणीच्या माध्यमातून हा विषय १ लाख लोकांपर्यंत पोचला. या वेळी सौ. ज्योती दाभोलकर म्हणाल्या की, १ जानेवारीला ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ होतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही गोष्टीत आपण इंग्रजांच्या पारतंत्र्याचा त्याग केलेला नाही. त्यातील हा एक प्रकार आहे. याचा आपण त्याग केला पाहिजे.