येत्या १५ ते २० वर्षांत धर्मांधांच्या गृहयुद्धाद्वारे भारताची पुन्हा फाळणी होण्याचा धोका ! – श्री. जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)
नवी देहली – मदरसे बंद करण्याचे सूत्र मी उपस्थित केले आहे. त्याकडे दुर्लक्ष केले, तर पुढील १५ ते २० वर्षांत धर्मांध भारतात गृहयुद्ध करतील आणि भारताची पुन्हा फाळणी करून त्यांना एक तुकडा द्यावा लागेल, असे विधान जितेंद्र सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी इंग्रजी दैनिक ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘आज मदरशांमध्ये इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचे विचार शिकवले जात आहेत आणि मुसलमान मुलांमध्ये जिहाद पसरवला जात आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स
श्री. जितेंद्र त्यागी यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे
मदरशांमध्ये मुलांवर जिहादचा संस्कार केला जाते !
मदरशांमध्ये लहान मुलांमध्ये जिहादी विचारांचा संस्कार रुजवला जातो. त्यामुळे ते कट्टर होतात. त्यातूनच ते वेळ पडल्यास बंदूकही हातात घेतात.
मदरशांमधून दिलेल्या शिक्षणातून हिंसाचार होतो !
मदरशांमध्ये जे काही मुलांना शिकवले जाते, त्यामुळेच हिंसाचार आणि जिहादी कारवाया होत आहेत.
धर्मांधांची शक्ती न्यून करणे, हे माझे राजकीय ध्येय !
माझे राजकीय ध्येय हेच आहे की, धर्मांधांची शक्ती भारतात अल्प करणे; कारण देशातील मशिदी आणि मदरसे यांमधून इस्लामिक स्टेटचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे एक मोठे षड्यंत्र आहे ज्याला निधर्मीवादी समजू शकलेले नाहीत.
मंदिरे तोडून मशिदी बांधलेल्या अन्य जागाही हिंदू पुन्हा मागतील, यासाठी धर्मांध बाबरीसाठी लढत होते !
जर श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणाचा निकाल मुसलमानांच्या बाजूने लागला असता, तरीही ते तेथे रामललाची स्थापित केलेली मूर्ती हटवू शकले नसते; कारण त्यामुळे हिंसाचार झाला असता. ‘बाबरीच्या ढाच्यावरील अधिकार सोडला, तर ज्या ठिकाणी मंदिरे तोडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या मिळण्यासाठी हिंदू मागणी करतील’, याची धर्मांधांना भीती होती. त्यामुळेच ते बाबरी ढाच्यावरील अधिकार सोडू इच्छित नव्हते.
सनातनी बनण्यासाठी (हिंदु धर्मात प्रवेश करण्यासाठी) कुठल्याही जातीमध्ये जाण्यास सिद्ध होतो !
‘सनातन धर्म स्वीकारण्यापूर्वी हा प्रश्न उपस्थित झाला होता की, तुम्ही कोणत्या जातीमध्ये जाणार ?’ या प्रश्नावर त्यागी म्हणाले की, सनातनी होण्यासाठी मी कुठल्याही जातीमध्ये जाण्यास सिद्ध होतो. अनुसूचित जातीमध्येही जाण्यास सिद्ध होतो.