कुणिगल (कर्नाटक) : मुसलमान कार्यकर्ता न नेमल्याने उद्दाम धर्मांधांकडून अंगणवादी केंद्र बंद !
गेल्या २२ दिवसांपासून अंगणवाडी बंद !
|
तुमकूरू (कर्नाटक) – तुमकूरू जिल्ह्यातील कुणिगल तालुक्यातील बोम्मेनहळ्ळी पाळ्य या मुसलमानबहुल गावातील अंगणवाडी केंद्रात गेल्या २२ दिवसांपासून धर्मांध गावकर्यांनी टाळे लावले आहे. गावातील अंगणवाडी कार्यकर्त्याच्या नेमणुकीविषयी वाद झाला असून ‘हा वाद मिटेपर्यंत टाळे काढणार नाही’, असे या गावकर्यांचे म्हणणे आहे.
गावातील अंगणवाडी केंद्रात तालुक्यातील विजयनगर संकुलाच्या छोट्या अंगणवाडी केंद्राची कार्यकर्ती सुमा यांची २६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी नेमणूक करण्यात आली होती. १० नोव्हेंबरला उपस्थित होण्यासाठी निरीक्षकांसह गावात आल्यावर गावकर्यांनी तिच्या नियुक्तीला विरोध करत अंगणवाडी केंद्राला टाळे लावले. योजनाधिकार्यांनी कुणिगल पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलीस गावात जाऊनही ते अंगणवाडी केंद्राचे कुलूप काढू शकले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
गावातीलच मुसलमान कार्यकर्ता नेमण्याची गावकर्यांची मागणी
गावात ९९ टक्के मुसलमान असल्याने गावातील मुसलमानाचीच ‘कार्यकर्ता’ म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे. सुमा यांनी याविषयी वरिष्ठ अधिकार्यांना अवगत केले आहे.