(म्हणे) ‘आम्हाला साधूंचा आशीर्वाद नको !’ – डी.के. शिवकुमार, काँग्रेस, कर्नाटक
काँग्रेसच्या स्थापनादिनी आशीर्वाद देण्यास आलेल्या साधूंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले अपमानित !
|
मद्दूरू (कर्नाटक) – कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी तेथे काँग्रेसवाल्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या साधूंचा आशीर्वाद घेण्यास नकार देऊन त्यांना अपमानित केल्याची घटना काँग्रेसच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात घडली.
शिवपूरमधील खासगी समुदाय भवनात काँग्रेसच्या १३७ व्या स्थापनदिनाच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर हे कार्यक्रमात बोलत होते. सभागृहाच्या पुढच्या भागात डी.के. शिवकुमार आणि मान्यवर व्यक्ती बसल्या होत्या. कार्यक्रम चालू असल्याचे पाहून तेथे काही साधू तेथे आले. त्यांनी डी.के. शिवकुमार यांना ‘आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत’, असे सांगितले; परंतु त्यांच्या बोलण्याला किंचित्ही मान न देता डी.के. शिवकुमार बसल्या जागेवरून हात जोडून ‘तुमचा आशीर्वाद नको’, असे म्हणाले. आशीर्वाद घेण्यास नकार दिल्याचे पाहून साधू परत गेले.