भिवानी (हरियाणा) येथे भूस्खलनात दोघांचा मृत्यू
१० वाहने आणि २० जण दबले गेल्याची भीती
भिवानी (हरियाणा) – भिवानी जिल्ह्यात भूस्खलनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाखाली १० वाहने दबली गेली असून यात जवळपास २० लोक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा मोठा भाग खचल्याने ही घटना घडली. या घटनेत खाणीमध्ये वापरण्यात येणारी काही यंत्रेही दबल्याचे सांगण्यात येत आहे.
The incident happened at the mining site in Bhiwani district of #Haryana after a portion of stone mine crashed down on the workers, reportedly owing to a landslidehttps://t.co/J8lKQ9JBUU
— Hindustan Times (@htTweets) January 1, 2022