उडुपी : सरकारी महाविद्यायालतील वर्गात ‘हिजाब’वर बंदी
मुसलमानांकडून विरोध !
कुठे महाविद्यालयात हिजाबवर (डोके झाकण्याच्या कापडावर) बंदी घातल्यावर त्याला विरोध करणारे मुसलमान, तर कुठे कॉन्व्हेंट शाळांमध्ये बांगड्या, टिळा, मेंदी आदी धार्मिक गोष्टींवर बंदी घातल्यावर निष्क्रीय रहाणारे हिंदू ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – उडुपी जिल्ह्यात असलेल्या एका सरकारी महाविद्यालयात हिजाब वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे शुक्रवार, ३१ डिसेंबर या दिवशी हिजाब घातलेल्या अनेक विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश दिला गेला नाही. ‘विद्यार्थिनींनी हिजाब काढल्यानंतरच त्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल’, असे सांगण्यात आले.
WEARING HIJAB? NO ENTRY IN CLASS#Udupi govt college in #Karnataka has banned students from wearing a #hijab. Girls have been denied entry in class unless they take off their headscarves making them worry about losing out on attendance @NehaHebbs with this report. pic.twitter.com/gLXoCojFTi
— Mirror Now (@MirrorNow) December 31, 2021
१. महाविद्यालयाच्या अधिकार्यांनी सांगितले की, वर्गात एकसमानता सुनिश्चित करण्यासाठी हिजाबवर बंदी लादण्यात आली आहे.
२. महाविद्यालयाच्या प्राचार्याने सांगितले की, विद्यार्थिनी शैक्षणिक संस्थेच्या आवारात हिजाब घालू शकतात; परंतु वर्गात हिजाब वापरण्यास बंदी आहे. याला विरोध होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी पालक आणि शिक्षक यांची बैठक घेतली जाईल.