पाकिस्तान काश्मिरी युवकांचा बुद्धीभेद करून त्यांचे जीवन नष्ट करत आहे !
ठार झालेल्या आतंकवाद्याच्या पत्नीचा घरचा अहेर !
पाककडून इस्लामच्या नावाखाली बुद्धीभेद केला जात असल्याने मुसलमान तरुण त्याला बळी पडतात, हे १०० टक्के सत्य नसून त्यांच्यातच जिहादी मानसिकता असल्याने ते पाकच्या सहज आहारी जातात, हेही तितकेच स्पष्ट आहे ! – संपादक
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील मुसलमान युवकांची दिशाभूल आणि बुद्धीभेद केला जात आहे. इस्लामच्या नावाचा दुरुपयोग करत युवकांचे जीवन नष्ट केले जात आहे, असा घरचा अहेर वर्ष २०१८ मध्ये सुरक्षादलांनी ठार केलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या आतंकवाद्याची पत्नी रजिया बीबी हिने म्हटले आहे. त्यांनी युवकांना अशा लोकांपासून दूर रहाण्याचा आणि त्यांच्या विचारांना बळी न पडण्याचा काश्मिरी युवकांना सल्ला दिला आहे. ‘खरा स्वर्ग भारतामध्ये आहे, पाकमध्ये नाही’, असेही त्यांनी सांगितले. रजिया बीबी पाकची राजधानी इस्लामाबाद येथे रहात होत्या. तेथून त्या काश्मीरमध्ये परतल्या आहेत.
I collected some money and decided to go back to India. Coming back to India was a very good decision. My children are really happy. Pakistan does not take care of their own citizens, what will they do for those who go from here? There is no humanity in Pakistan: Razia Bibi pic.twitter.com/FBkklARvAF
— ANI (@ANI) December 30, 2021
रजिया बीबी पुढे म्हणाल्या की,
१. एकदा आतंकवादी ठार झाल्यानंतर कोणतीही आतंकवादी संघटना या आतंकवाद्याच्या कुटुंबियांची देखभाल करत नाही. त्यांना वार्यावर सोडून देते. (पाकने वार्यावर सोडले नसते, तर रजिया बीबी भारतात परतल्या नसत्या, हेही तितकेच खरे आहे ! काश्मिरी मुसलमानांना भारताकडून मिळणारे सर्व लाभही हवेत आणि पाकिस्तानची इस्लामी कट्टरताही हवी आहे, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)
२. मी पाकमधून भारतात येण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे माझी मुले आनंदी आहेत. पाकिस्तान स्वतःच्या नागरिकांची काळजी घेत नाही. पाकमध्ये मानवता नाही. (पाक इस्लामी राष्ट्र असतांनाही तेथे मानवता नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की, इस्लामचा उदोउदो करणारे मानवतेचे शत्रूच आहेत ! – संपादक)