बागलकोटे (कर्नाटक) : हिंदु धर्मांतराच्या तक्रारीनंतर ‘सेंट पॉल शाळा’ बंद
तक्रारीनंतर तत्परतेने अशा प्रकारचा निर्णय घेणार्या कर्नाटक प्रशासनाचे अभिनंदन ! अशी तत्परता सर्वत्र असली पाहिजे आणि त्यातही कुणी तक्रार करण्यापेक्षा प्रशासनाने सतर्क राहून अशा घटना रोखण्यासाठी त्वरित कारवाई केली पाहिजे ! – संपादक
बागलकोटे (कर्नाटक) – बागलकोटे जिल्ह्यातील हुनगुंद येथील इळकल भागामध्ये असणार्या सेंट पॉल उच्च माध्यमिक शाळेला विद्यार्थी आणि त्यांचे पालक, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी धर्मांतराविषयी केलेल्या तक्रारीनंतर बंद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या अधिकार्याने शाळेचे निरीक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.