विजयदुर्ग किल्ल्यावर आज दीपोत्सव
नेत्रतपासणी शिबिर आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन
देवगड, ३१ डिसेंबर (वार्ता.) – विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित आणि विजयदुर्ग, रामेश्वर अन् गिर्ये या ३ ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने विजयदुर्ग किल्ल्यावर १ जानेवारी २०२२ या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ३ गावांतील ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि सैनिक यांच्यासाठी दिवे लावून दीपोत्सव साजरा करणार आहेत. यानिमित्त शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके शिरगाव, कोल्हापूर येथील हनुमान तालीम-लेझीम मित्रमंडळ सादर करणार आहे. यासह स्वच्छता अभियान आणि नेत्रतपासणी शिबिर यांचेही आयोजन करण्यात आले आहे.
(खालील कार्यक्रम पत्रिका वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
यानिमित्त १ जानेवारी या दिवशी दुपारी ३.३० वाजता विजयदुर्ग जेटीजवळ ग्रामस्थ जमणार आहेत. तेथून ४ वाजता ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या पालखीचे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयाकडे महिला औक्षण करणार आहेत. विजयदुर्ग किल्ल्यावर पालखीची आरती करण्यात येईल.
त्यानंतर शिवशाहीर (कै.) बाबासाहेब पुरंदरे आणि तिन्ही दलांचे प्रमुख (कै.) जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वहाण्यात येईल. सायंकाळी ५.३० वाजता मशाली प्रज्वलित करून महाराजांची पालखी किल्ल्यातील श्री भवानीमातेच्या मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. सायंकाळी पालखीचे मंदिरात आगमन झाल्यावर आरती होईल. सायंकाळी ७ वाजता दरबार हॅालमध्ये पालखी विराजमान झाल्यावर मानवंदना देऊन जयघोष करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :
♦ विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यांसाठी स्थानिक ग्रामस्थांची निदर्शने
https://sanatanprabhat.org/marathi/539879.html
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोखले, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी किल्ला संवर्धनाविषयीच्या मागण्यांचे फलक हाती घेतले होते.