पुणे पोलीसदलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकांची आत्महत्या !
कमकुवत मन आत्महत्येकडे वळते. मनोबल वाढण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. पोलीस कमकुवत होत असतील, तर त्याचा वरिष्ठ पोलिसांनी गांभीर्याने विचार करून त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे.
पुणे – शहर पोलीसदलाच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली. ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी त्यांनी त्यांच्या रहात्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. गुन्हे शाखेत नेमणूक होण्यापूर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलीसदलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या.