सातारा शहरात आढळला पहिला ‘ओमिक्रॉन’चा रुग्ण !
सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – शहरात न्यूयॉर्कहून आलेल्या युवतीचा ‘ओमिक्रॉन’चा अहवाल सकारात्मक आला असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यात ‘ओमिक्रॉन’बाधित रुग्णांची संख्या ६ हून अधिक झाली आहे.
डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, ‘‘१९ वर्षीय युवती न्यूयॉर्क येथे वास्तव्यास होती. तिच्या वडिलांसमवेत ती २३ डिसेंबर या दिवशी सातारा येथे आली. तिला त्रास होऊ लागल्यानंतर ‘ओमिक्रॉन’ची चाचणी करण्यात आली. ती सकारात्मक आली. तिच्या संपर्कात आलेले आणि तिचे कुटुंबीय यांची चाचणी करण्यात येणार आहे. यापूर्वी फलटण येथे ५ रुग्ण आढळून आले होते.