कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या मृत्यूत्तर विधींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या मृत्यूत्तर विधींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे विधींच्या वेळी विधींचा कर्ता (श्री. रामदास केसरकर), विधींचे पुरोहित (श्री. ईशान जोशी) आणि विधींतील अन्य घटक यांचे केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांचे १८.१०.२०२१ या दिवशी देहावसान झाले. तेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असल्यामुळे त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. मृत्यूत्तर व्यक्तीला पुढची गती मिळावी यासाठी हिंदु धर्मात मृत्यूत्तर विधी करण्यास सांगितले आहेत. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या मृत्यूत्तर विधींच्या (९ व्या, १० व्या आणि १२ व्या दिवशीच्या विधींच्या) संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे. यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि आध्यात्मिक विश्लेषण पुढे दिले आहे.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या ९ व्या, १० व्या (दशक्रिया विधी) आणि १२ व्या दिवशीच्या (सपिंडीकरण श्राद्ध) विधींच्या वेळी विधींचा कर्ता (श्री. रामदास केसरकर), विधींचे पुरोहित (श्री. ईशान जोशी) आणि विधींतील अन्य घटक यांची (अश्म, अवयव पिंड, कर्त्याचे उत्तरीय वस्त्र इत्यादी घटकांची) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. विधीच्या ठिकाणी मृत व्यक्तीचे छायाचित्र ठेवल्याने त्यावर काय परिणाम होतो, हेही अभ्यासण्यात आले.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


विधींचा कर्ता श्री. रामदास केसरकर आणि विधींचे पुरोहित श्री. ईशान जोशी

२. चाचण्यांतील घटकांशी संबंधित माहिती

२ अ. अश्म : ‘मृतदेहाचा कपाळमोक्ष झाल्यानंतर (कवटी फुटल्याचा ध्वनी ऐकू आल्यानंतर) कर्ता खांद्यावर पाण्याचे मडके घेऊन मृत व्यक्तीच्या पायांकडे दक्षिण दिशेला तोंड करून उभा राहतो. दुसरी एखादी व्यक्ती कर्त्याच्या मागे उभी राहून स्मशानातीलच लहान दगडाने त्या मडक्याच्या गळ्याच्या (तोंडाच्या खालच्या भागाच्या) खाली एक भोक पाडते. या दगडाला ‘अश्म’ असे म्हणतात. दहनविधी पूर्ण करून घरी आल्यावर आधी अश्म अंगणातील तुळशी-वृंदावनाच्या परिसरात ठेवावा; मात्र तुळशीत ठेवू नये. तुळशीवृंदावन नसल्यास अश्म घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

२ आ. पिंडदान : शास्त्रानुसार पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत प्रतिदिन तीलांजली, पिंडदान, तसेच विषम दिवशी विषमश्राद्ध करावे. समदिवशी फक्त तीलांजली, पिंडदान करायचे. मृत्यू झाल्याच्या दिवसापासून १० व्या दिवसापर्यंत प्रतिदिन तीलांजली आणि अवयव पिंडदान विधी केले जातात; मात्र मृत्यू झाल्याच्या दिवसापासून १० व्या दिवसापर्यंत जे विषम दिवस येतात (१, ३, ५, ७, ९ या दिवशी ) त्या दिवसात विषमश्राद्ध केले जाते. (विषमश्राद्धाप्रमाणे सम दिवशी समश्राद्ध केले जात नाही.) ते शक्य नसल्यास निदान नवव्या दिवसापासून उत्तरक्रिया चालू करावी; मात्र आजकाल पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंतचे पिंडदान दहाव्या दिवशी एकत्रच करतात. दहाव्या दिवशी नदीकाठच्या किंवा घाटावरच्या शिवाच्या किंवा कनिष्ठ देवतांच्या देवळांत पिंडदान करावे. दहाव्या दिवशी पिंड देऊन झाल्यावर अश्म्यावर थोडेसे खोबरेल तेल घालून तो वाहत्या पाण्यात विसर्जित करावा.’

२ इ. उत्तरीय : ‘मृतदेहाची पावले उघडी ठेवून उर्वरित मृतदेह अखंड कोर्‍या पांढर्‍या वस्त्राने झाकतात. मुखमंडलावरील वस्त्राच्या भागाला छेद देऊन मुख (चेहरा) उघडे ठेवतात. पायाकडील वस्त्राचा भाग (एकूण वस्त्राच्या एक चतुर्थांश भाग) कापून कर्त्याने त्याचा उत्तरीय (उपरणे) म्हणून १२ व्या दिवसापर्यंत वापर करावा. (विधीसाठी वापरलेले ) उत्तरीय हरवू नये. हे वस्त्र १२ व्या दिवशी सपिंडीविधीत पिंडांच्या ठिकाणी ठेवतात आणि पिंडांसह विसर्जित करतात.’
(संदर्भ : https://www.sanatan.org/mr/a/872.html)

२ ई. सपिंडीकरण श्राद्ध : ‘सपिंडीकरण श्राद्ध करण्याचा अधिकार यावा म्हणून १६ मासिक श्राद्धे सपिंडीकरण श्राद्धापूर्वी ११ व्या किंवा १२ व्या दिवशी करावीत. १२ व्या दिवशी सपिंडीकरण श्राद्ध करावे. सपिंडीकरण श्राद्ध केल्याने मृत जिवाला ‘पितृ’ ही संज्ञा प्राप्त होऊन त्याला पितृलोकात स्थान मिळते. खरे पहाता १६ मासिक श्राद्धे त्या त्या मासात करणे आणि सपिंडीकरण श्राद्ध वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी करणे उचित ठरते; पण आजकाल हे सर्व १२ व्या दिवशीच करायचा प्रघात आहे.’
(संदर्भ : https://www.sanatan.org/mr/a/880.html)

३. चाचण्यांतील घटकांची निरीक्षणे

यापूर्वी महालयाच्या वेळी प्रतिदिन श्राद्ध करणार्‍या पुरोहितांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे दिसून आले; मात्र तेथील अन्य वस्तूंवर नकारात्मक परिणाम झाला होता. त्या वेळी अशी अनुभूती पुरोहित आणि श्राद्ध करणार्‍या सर्वच साधकांना आली की, ‘सर्व साधकांचे पितर श्राद्धानंतर पुरोहित अन् यजमान यांना तृप्त होऊन आशीर्वाद देत आहेत आणि यामध्ये केवळ अतृप्तच आत्मे नाहीत, तर अनेक पुण्यात्मेही आहेत’, असे जाणवले. त्याप्रमाणेच कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या विधीनंतर त्यांचे आशीर्वाद लाभल्याने श्री. रामदास केसरकर आणि पुरोहित श्री. ईशान जोशी यांच्यावर विधींचा सकारात्मक परिणाम झाला.

कु. मधुरा भोसले

४. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या तिन्ही दिवशीच्या विधींचा (९ व्या, १० व्या आणि १२ व्या दिवशीच्या विधींचा) विधीतील घटकांवर झालेला परिणाम

४ अ. श्री. रामदास केसरकर आणि पुरोहित श्री. ईशान जोशी यांच्यावर विधींचा सकारात्मक परिणाम होणे : श्री. रामदास केसरकर आणि पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी सर्व विधी भावपूर्ण केले. तिन्ही दिवसांच्या विधींनंतर विधी करणारे श्री. रामदास केसरकर आणि पुरोहित श्री. ईशान जोशी यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. यातून विधीचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला, हे लक्षात येते.

४ आ. श्री. रामदास केसरकर यांच्या उत्तरीय वस्त्रावर झालेला परिणाम आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र : कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या ९ व्या आणि १२ व्या दिवसांच्या विधीनंतर श्री. रामदास केसरकर यांच्या उत्तरीय वस्त्रातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. १० व्या दिवसाच्या विधीनंतर मात्र त्यांच्या उत्तरीय वस्त्रातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

४ आ १. श्री. रामदास केसरकर यांनी ९ व्या आणि १२ व्या दिवसांचे विधी अत्यंत भावपूर्णरित्या केल्यामुळे त्यांच्या उत्तरीय वस्त्रातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जा वाढणे : ‘उत्तरीय वस्त्रामध्ये मृत व्यक्तीची स्पंदने ३० टक्के असतात. त्यामुळे मृत व्यक्तीच्या मृत्यूत्तर विधींच्या वेळी कर्त्याने खांद्यावर उत्तरीय वस्त्र धारण करून विधी केल्यावर विधींचा परिणाम उत्तरीय वस्त्रावर होऊन त्यामध्ये आकृष्ट झालेली स्पंदने मृत व्यक्तीच्या लिंगदेहापर्यंत पोचून लिंगदेहावर आध्यात्मिक उपाय होतात आणि त्याला मृत्यूत्तर प्रवास करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते. कै. (सौ.) केसरकर यांच्या ९ व्या आणि १२ व्या दिवसांचे विधी अत्यंत भावपूर्णरित्या केल्यामुळे श्री. रामदास केसरकर यांच्या उत्तरीय वस्त्रातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.

४ आ २. दहाव्या दिवसाच्या विधीनंतर श्री. रामदास केसरकर यांच्या उत्तरीय वस्त्रातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून येण्याचे कारण : १२ व्या दिवशी होणार्‍या सपिंडीकरण श्राद्धामुळे कै. (सौ.) केसरकरकाकूंची गणना पितरांमध्ये होणार होती. त्यामुळे प्रत्येक वर्षीच्या त्यांच्यासाठी केलेल्या श्राद्धकर्माचे फळ त्यांना मिळून त्यांचा आध्यात्मिक त्रास न्यून होणार आहे. ‘कै. (सौ.) केसरकरकाकू यांना धार्मिक विधींचा हा लाभ मिळू नये’, यासाठी वाईट शक्तींनी श्री. रामदास केसरकर यांच्या उत्तरीय वस्त्रावर त्रासदायक शक्ती सोडून त्यावर आवरण आणले. त्यामुळे त्यांच्या उत्तरीय वस्त्रातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०२१)

४ इ. विधींनंतर विधीतील काही घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून येणे : ९ व्या, १० व्या आणि १२ व्या दिवसांच्या विधींनंतर विधीतील काही घटकांमध्ये (पिंड, कूर्च (दर्भ) इत्यादींमध्ये) सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. विधींच्या वेळी देव आणि पितर यांना एक एक दर्भ अर्पण करून निमंत्रित केले जाते. विधी करतांना कर्ता दर्भावर पिंड ठेवून त्याचे पूजन करतो. कर्त्याने पिंडदान (पिंडांचे पूजन) (अशा आध्यात्मिक शब्दांचे अर्थ एकत्र करणे – मृत्त्यूत्तर विधीच्या धारिकेत + एकत्र एक धारिका) केल्याने पितर भुवर्लोकातून पिंडांकडे सहज आकृष्ट होतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते. पिंडांकडे पितर आकृष्ट होतांना त्यांच्याभोवती असणार्‍या रज-तमात्मक वायूमंडलाचा परिणाम दर्भ आणि पिंड यांवर होतो.

४ ई. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या १० व्या दिवसाच्या विधीनंतर अश्मातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होणे : सर्वसाधारणपणे मृत्यूनंतर व्यक्तीचा लिंगदेह तिच्या १० व्या दिवसाचा विधी होईपर्यंत अश्मावर विसावतो. १० व्या दिवशीच्या विधीत अश्म विसर्जित करण्यात येतो; कारण अश्मामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या लिंगदेहाचा वास असतो. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या अश्माची सर्व निरीक्षणे पुढे दिली आहेत.

सौ. मधुरा कर्वे

वरील निरीक्षणांतून असे लक्षात येते की, २४ ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अश्मामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे. विशेष म्हणजे त्यातील सकारात्मक ऊर्जेत प्रतिदिन विलक्षण वाढ होत गेली. यातून ‘कै. (सौ.) केसरकरकाकू यांच्या लिंगदेहाने विधीतील चैतन्य ग्रहण केले आणि तो उच्च लोकाकडे मार्गस्थ झाला’, असे जाणवले. दहाव्या दिवसाच्या विधीनंतर अश्म विसर्जित करण्यात आला. विधीनंतर अश्मातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाल्याचे आढळून आले. यातून हिंदु धर्मात मृत्यूत्तर सांगितलेले विधी केल्याने व्यक्तीच्या लिंगदेहाला आध्यात्मिक स्तरावर कशा प्रकारे लाभ होतो, हे लक्षात येते.

४ उ. विधींनंतर कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ होणे : कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या छायाचित्रामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच आढळली नाही. तिन्ही दिवसांच्या विधीनंतर त्यांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ झाली. हे पुढील सारणीतून लक्षात येते.

‘मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला पितृलोकात गमन करता यावे, तसेच त्याला पुढे चांगला लोक प्राप्त व्हावा’, यासाठी हिंदु धर्मात मृत्यूत्तर विधी करण्यास सांगितले आहेत. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जा ९ व्या दिवशीच्या विधीपूर्वी ५६.७५ मीटर होती. १२ व्या दिवशीच्या विधीनंतर त्यांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जा वाढून ४३७.६० मीटर झाली. कै. केसरकरकाकू यांच्या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेत प्रत्येक विधीनंतर झालेली लक्षणीय वाढ हे त्यांचा मृत्यूत्तर अध्यात्मातील प्रवास जलद गतीने होत असल्याचे निर्देशक आहे.

थोडक्यात ‘हिंदु धर्मात सांगितलेले मृत्यूत्तर विधी केल्याने मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतात’, हे या संशोधनातून स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.११.२०२१)
ई-मेल : mav.research2014@gmail.com

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक