५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. तनुश्री शैलेश लेले (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. तनुश्री शैलेश लेले ही या पिढीतील एक आहे !
‘मार्गशीर्ष अमावास्या (२.१.२०२२) या दिवशी रामनाथ (अलिबाग) जिल्हा रायगड, येथील बालसाधिका कु. तनुश्री शैलेश लेले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला तनुश्रीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. तनुश्री शैलेश लेले हिला चौथ्या वाढदिवसानिनित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मानंतर
१ अ. बालिका जन्मतःच हसरी असणे : बालिका जन्माला आल्यावर आधुनिक वैद्या म्हणाल्या, ‘‘माझ्या रुग्णालयात एवढी मुले जन्माला आली आहेत; पण ही वेगळीच आहे. जन्म झाल्यावर ती लगेच रडली नाही, तर हसली. पहाटे जन्म झाल्यानंतर ती एकदम दुपारी झोपली, तोपर्यंत ती जागी होती.’’
१ आ. बोलणे समजत असल्याप्रमाणे एकटक पहाणे : बारशाच्या दिवशी तनुश्रीची आजी पाळणा म्हणत असतांना ती आजीकडे एकटक पहात हुंकार देत होती. तनुश्री १५ दिवसांची असतांना आमच्या ओळखीच्या एक बाई घरी आल्या होत्या. त्यांच्याकडे ती एकटक पहात त्यांचे बोलणे ऐकत होती आणि हसत होती. जणू तिला सगळे कळत होते.
२. वय १ ते ६ मास
जन्मानंतर सहाव्या मासात तनुश्रीने एका मंगळवारी ‘भू’ हा शब्द उच्चारला, तसेच आठव्या मासात ती ‘ॐ नमः शिवाय ।’, असे म्हणाली.
३. वय ७ मास ते दीड वर्ष
३ अ. व्यवस्थितपणा : तनुश्री दीड वर्षांची असतांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तिला पू. कलावतीआईंच्या मठात घेऊन गेले होते. तेथे महिला बसलेल्या ठिकाणी एका कोपर्यात सतरंजी दुमडलेली होती. तनुश्रीने ती सतरंजी सरळ करून ठेवली.
३ आ. देवाची आवड : तनुश्रीला नामजप, देवीचे मंत्र आणि मारुति स्तोत्र म्हणण्याची आवड आहे. तिचे पाठांतर चांगले आहे. तसेच तिला धार्मिक कृती करण्याची आवड आहे.
४. वय २ ते ४ वर्षे
४ अ. तनुश्री नामजप करू लागल्यावर एका वर्षाच्या आत कुलदेवीच्या दर्शनाचा योग येणे : वर्ष २०१९ मध्ये एकदा मला सनातनच्या साधिका सौ. विशाखा आठवले ग्रामदेवतेच्या देवळात भेटल्या. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन या आणि कुलदेवतेचा नामजप चालू करा.’’ त्यानंतर तनुश्री नामजप करू लागली आणि नंतर एक वर्षाच्या आत आम्हाला कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याचा योग आला.
४ आ. ज्योतिषांनी सांगितलेले विधी केल्यावर तनुश्रीचा त्रास अल्प होऊन तिला शांत झोप लागणे : मार्च २०२१ मध्ये आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू केले. त्यातून मला नाशिक येथील एका ज्योतिषांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांना तनुश्रीच्या त्रासांविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तिला दृष्टीदोष आहे, बाहेरची बाधा आणि करणी दोष आहे.’’ त्यांनी काही विधी करून तिचा त्रास अल्प केला. ज्या दिवशी हे विधी केले, त्या रात्री ती प्रथमच, म्हणजे अडीच वर्षांनी शांत झोपली.
५. तनुश्रीचे आध्यात्मिक त्रास आणि त्यावर केलेले उपाय
अ. सनातन संस्थेच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे तिची दृष्ट काढल्यावर तिच्यात पुष्कळ पालट जाणवले. ‘तिच्यावरून लिंबू आणि नारळ उतरवणे किंवा तुरटी फिरवणे’ असे उपाय केल्यावर तिचा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात अल्प झाला.
आ. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मी रात्री तुळशीजवळ पाणी ठेवते आणि ते पाणी तिला सकाळी प्यायला देते. ज्या दिवशी तिला दृष्ट लागली असेल, त्या दिवशी ती पाणी पित नाही. अशा वेळी तिची मीठ-मोहरीने दृष्ट काढल्यावर तिच्यात पालट जाणवतो.
६. स्वभावदोष
चंचलता आणि हट्टीपणा’
– सौ. अनुश्री लेले (तनुश्रीची आई), रामनाथ (अलिबाग), जिल्हा रायगड. (१६.८.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |