केरळ येथील श्री. जयंत परूळकर यांना भाववृद्धी सत्संगात आलेली अनुभूती
‘केरळ येथील सनातनच्या साधिका श्रीमती नीता सुखठणकर यांचे चुलत बंधू श्री. जयंत परूळकर काही मासांपासून ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक, आणि सनातन संस्थेचे हितचिंतक यांच्यासाठी रविवारी असणारा भाववृद्धी सत्संग ऐकतात. भाववृद्धी सत्संग ऐकतांना त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. भाववृद्धी सत्संगात भगवान विष्णूचे चित्र पहातांना ‘देव समोर असून त्याच्या चरणांवरून बोटे फिरवत आहे’, असे जाणवणे आणि त्याच्या चरणांचा तो स्पर्श अतिशय मऊ जाणवणे
‘एका भाववृद्धी सत्संगात जेव्हा भगवान विष्णूचे चित्र दाखवत होते, तेव्हा मी त्याच्या चरणांना स्पर्श केला आणि माझी बोटे त्याच्या चरणांवरून फिरवत होतो. मला वाटले, ‘देव माझ्या समोरच आहे आणि मी त्याच्या चरणांवरून माझी बोटे फिरवत आहे.’ त्याच्या चरणांचा तो स्पर्श मला अतिशय मऊ, अगदी वेगळाच मऊ जाणवत होता.
२. ‘दिवंगत आईला सद्गती मिळू दे, तिची काळजी घे आणि आम्हा भावंडांवर कृपा कर’, असे शरणागतीने देवाला विनवणे
मी पहिल्यांदा ‘माझ्या दिवंगत आईला सद्गती मिळू देत आणि ती जेथे असेल, तेथे तिची काळजी घे’, म्हणून देवाला प्रार्थना केली. नंतर ‘आम्हा भावंडांवर कृपा कर’, म्हणून शरणागतीने विनवले.’
– श्री. जयंत परूळकर (केरळ येथील श्रीमती नीता सुखठणकर यांचा चुलत भाऊ) (८.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |