हिंदूंनो, याचा विचार करा !
१. ‘आम्ही धीट, स्वावलंबी आणि राष्ट्रीयतेचा अभिमान बाळगणारे असतो, तर चित्र वेगळे दिसले असते !’
‘जर का आम्ही अधिक धीट आणि स्वावलंबी असतो, स्वतःच्या पायांवर उभे रहातांना आम्ही कच खाल्ली नसती, तसेच आमच्या राष्ट्रीयतेची आम्हाला लाज वाटली नसती, तर (या देशाचे चित्र) किती आगळे वेगळे दिसले असते !
२. पाश्चात्त्य संस्कृतीच्या बाजारूपणापुढे पौरस्त्य (पूर्वेकडील) संस्कृती मुळीच कोलमडून पडणार नसणे
पाश्चात्त्य संस्कृतीच्या लाटेला सामोरे जातांना आम्ही आपली भूमिका समानतेची का ठेवत नाही ? आमची पौरस्त्य संस्कृती इथे दोन सहस्र वर्षांपासून नांदते आहे. पाश्चात्त्यांच्या या बाजारूपणापुढे तिचा आत्मा कोलमडून पडेल का ?
३. पौरस्त्य संस्कृती विश्वाच्या आध्यात्मिक जीवनात पुनःप्रभावी होणार असणे
पुष्कळ वेळा माझ्या मनात येते, ‘पौरस्त्य संस्कृती मरून पडली नाही; पण झोपली आहे आणि विश्वाच्या आध्यात्मिक जीवनात ती पुनः आपली प्रभावी भूमिका निश्चितपणे वठवणार आहे.’
– डॉ. आनंदकुमार स्वामी