काही सुविचार
जपून बोलण्याचे महत्त्व
बोलणारा सहज बोलून जातो; पण त्याला कुठे माहिती असते की, ऐकणार्याच्या मनावर शब्द न् शब्द कोरला जातो.
निरपेक्षता
आयुष्यात मनस्तापाची अवस्था टाळायची असेल, तर कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका.
गुणांचे महत्त्व
मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो. उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सुदृढ शरीर असूनही उत्तम गुण नसतील, तर या गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात.
(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान’, २१.४.२०१८)