पुणे येथील गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने केले आक्रमण !
यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटत नाही, हेच लक्षात येते ! स्वत:चेही रक्षण करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक
पुणे – येथील येरवडा परिसरातील कोतेवस्ती येथे ३० डिसेंबरच्या रात्री शक्तीसिंह या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने आक्रमण केले आहे. त्यानंतर पोलिसांना स्वत:च्या रक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागला. जमावाच्या आक्रमणात २ पोलीस जखमी झाले आहेत.
रेकॉर्डवरील आरोपी शक्तीसिंह हा साथीदारांच्या साहाय्याने या परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. पोलीस ठाण्याचे पथक शक्तीसिंह याला पकडायला गेले असता त्याने समाजातील नागरिकांना एकत्र करून पोलिसांविरुद्ध भडकावले. त्यानंतर तेथील नागरिक पोलिसांवर चालून आले. शक्तीसिंह याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.