कु. मयूरेश शैलेंद्र जोशी ४२ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून ठरला सुवर्ण पदक विजेता !
अकोला, २७ डिसेंबर (वार्ता.) – येथील कु. मयूरेश शैलेंद्र जोशी (वय ९ वर्षे) याने नुकत्याच पनवेल येथे झालेल्या ४२ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. त्याची आता राष्ट्र्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाविषयी सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन त्याला गौरवण्यात आले. मयूरेश हा अकोला येथील असून इयत्ता ३ रीत आहे. येथील कराटे महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकरे यांच्याकडे तो कराटे शिकतो. इतक्या अल्प वयात त्याने हे यश संपादन केल्याविषयी श्री. ठाकरे यांनी त्याचे पुष्कळ कौतुक केले आणि ‘त्याच्यावर नक्कीच देवाची कृपा आहे’, असे सांगितले. मयूरेश तबला शिकत असून त्याला गणित विषय आवडतो.
मयूरेश याला साधनेची आवड आहे. तो नियमित नामजप करतो. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि आरती त्याला म्हणायला आवडते. त्याचे आई-वडील कांदळी येथील सद़्गुरु सेवा मंडळ संचालित परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या आश्रमातील मार्गदर्शनानुसार साधना करतात. मयूरेशच्या आजी या अकोला येथे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात.