गुणसंपन्न असूनही ‘मी सर्वसामान्य आहे’, असे म्हणणारे पू. भाऊकाका !
३१.१२.२०२१ या दिवशी पू. भाऊकाकांची (पू. अनंत आठवले यांची) गुणवैशिष्ट्ये यांविषयी मी लिहिलेला लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला. तो लेख वाचून पू. भाऊकाकांनी मला भ्रमणभाष केला. त्या वेळी त्यांच्याशी झालेले संभाषण पुढे दिले आहे.
पू. भाऊकाका : दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये तुम्ही लिहिलेला लेख वाचला. तुम्ही उत्कृष्ट ‘मेकअप- आर्टिस्ट’ (रंगभूषाकार) आहात.
मी : काका, म्हणजे काय ?
पू. भाऊकाका : म्हणजे तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे मी तसा नाही. तुम्ही माझी गुणवैशिष्ट्ये रंगवून लिहिली आहेत.
मी : मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तुमच्यामुळे मला ‘कसे वागायचे ?’, ते कळले; म्हणून मी लिहिले.
पू. भाऊकाका : अहो, तुम्ही श्रीकृष्णांविषयी लिहा. त्याच्याकडून शिका. माझ्याकडून काय शिकता ? लांबच्या मार्गाने श्रीकृष्णांकडे जाऊ नका. सरळ जा. माझ्याकडून शिकत राहिलात, तर पुन:पुन्हा जन्म
घेत रहाल. आता प.पू. डॉक्टरांकडून शिका.
मी : मला आशीर्वाद द्या.
पू. भाऊकाका : माझ्या शुभकामना सर्वांना असतात; पण त्या फलद्रूप व्हायला पाहिजेत ना ?
मी : म्हणजे मी प्रयत्न करायला हवेत ना ?
पू. भाऊकाका : हो.
पू. भाऊकाका कधीच कोणत्या गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते नेहमी म्हणतात, ‘मी सर्वसामान्य आहे’ आणि ते सर्वसामान्याप्रमाणेच रहातात. पू. भाऊकाका भगवद्गीतेनुसार आचरण करतात. ते सर्वांवर पुष्कळ प्रेम करतात. अशा पू. भाऊकाकांचा सहवास आणि त्यांचे प्रेम अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२१)