सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले यांची कु. वेदिका दहातोंडे हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, परात्पर गुरु डॉक्टर यांचे ज्येष्ठ बंधू) यांची ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदिका दहातोंडे (वय १५ वर्षे) हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. शिकण्याची वृत्ती
‘पू. भाऊकाका अनेक ग्रंथांचे वाचन करतात. त्यांतून त्यांना जे काही शिकायला मिळते, ते परिच्छेद आणि त्यांच्या वाचनात आलेली महत्त्वाची वाक्ये ते त्यांच्या वहीत लिहून ठेवतात.
२. व्यवस्थितपणा
पू. भाऊकाका वहीच्या ज्या पानावर लिहितात, त्या पानाच्या खाली ‘प्लास्टिक’चा कागद ठेवतात. त्यामुळे खालच्या पानावर दाब पडत नाही आणि अक्षरे उमटत नाहीत. खालची पाने सरळ आणि व्यवस्थित रहातात.
३. परिस्थिती स्वीकारणे
पू. काका प्रतिदिन ३ – ४ वर्तमानपत्रे पूर्णपणे वाचतात. एखादे दिवशी वर्तमानपत्रे मिळाली नाहीत, तरी ते ती परिस्थिती सहजतेने स्वीकारतात.
४. अल्प अहं असणे
अ. एकदा माझी त्यांच्याकडील सेवा झाल्यावर मला आश्रमात न्यायला पुष्कळ वेळ कुणी आले नव्हते. तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘तुमचा सत्संग आज अधिक मिळावा’, असे ईश्वराचे नियोजन आहे.’’
आ. एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये माझा लेख छापून आल्यावर त्यांनी मला खाऊ दिला होता. तो खाऊ मी खात असतांना पू. काकांनी स्वतःहून मला पाणी आणून दिले. यातून त्यांच्यातील ‘प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण दिसून येतात. स्वतः संत असूनही ते त्याचा तीळमात्रही अहं जोपासत नाहीत.
इ. ‘एकदा पू. भाऊकाकांचे वाचनाचे पटल (टेबल) मार्गिकेत ठेवायचे होते. त्यांनी मला सांगितले, ‘‘पटल बाहेर काढा.’’ मी पटल बाहेर काढल्यावर ते मला म्हणाले, ‘‘पटल बाहेर काढता का ?’, असे मी तुम्हाला विचारायला हवे होते.’’
‘देवा, तू पू. भाऊकाकांच्या कृतींतून मला त्यांचे गुण शिकवलेस, तसेच पू. काकांच्या सेवेची संधी देऊन माझ्यावर मोठी कृपाच केली आहेस, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. वेदिका दहातोंडे (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय वर्षे १५), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.११.२०२१)