जिहादी कारवाया रोखण्यासाठी फ्रान्समध्ये आतापर्यंत २२ मशिदी बंद !
मशिदीचा इमाम त्याच्या मार्गदर्शनात ख्रिस्ती आणि ज्यू यांना लक्ष्य करत असल्यामुळे कारवाई
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्स सरकारने पॅरिसच्या उत्तरेला अनुमाने १०० किलोमीटर अंतरावर ५० सहस्र लोकसंख्या असलेल्या बोवई शहरातील एका मशिदीला बंद करण्याचा आदेश दिला आहे. फ्रान्स सरकारने आतापर्यंत बंद केलेल्या मशिदींपैकी ही २२ वी मशीद आहे. सरकारने म्हटले, ‘जगभरात होत असलेल्या आतंकवादी कारवाया पहाता, ही मशीद पुढील ६ मास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मशिदीचे इमाम (इस्लामी धार्मिक नेता) कट्टरतावादी विचारांचा प्रचार करत होते. काही दिवसांपूर्वी फ्रान्स सरकारने याच कारणाने एक मशीद ६ मासांसाठी बंद केली होती.
मशिदीत येणारे अनुमाने ४०० लोक हे इमामचे अनुयायी आहेत. हा इमाम त्याच्या व्याख्यानांमध्ये ख्रिस्ती, समलैंगिक आणि ज्यू यांना लक्ष्य करत असल्याचे फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी सांगितले. या इमामवर द्वेष, हिंसाचार आणि जिहादची (इस्लामच्या शत्रूंच्या विरोधातील युद्धाची) शिकवण दिल्याचा आरोप आहे.
फ्रांस की इमैनुएल मैक्रों सरकार ने उत्तरी हिस्से में स्थित एक मस्जिद को बंद करने का आदेश जारी किया है.#EmmanuelMacron #Mosque #Francehttps://t.co/fGGTEa9qu7
— ABP News (@ABPNews) December 29, 2021
१. मशीद बंद करण्याच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, इमामने जिहादला एक ‘कर्तव्य’ म्हटले आणि जिहाद्यांना इस्लामचे ‘हिरो’ (नायक) म्हणून दाखवले. तसेच इमामने मुसलमानेतरांना शत्रू ठरवले.
२. काही दिवसांपूर्वीच फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने देशातील २ सहस्र ६०० पेक्षा अधिक मशिदींपैकी १०० मशिदींची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. या ठिकाणांमधून कट्टरतावादी विचार पसरवल्याचा संशय सरकारला होता.