हिंदुत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ !
प्रवीण दरेकर यांची धर्मांध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना चेतावणी !
मुंबई – नसीरुद्दीन शाह यांसारख्या अभिनेत्याने धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचे आणि भारतात अशा प्रकारे शक्ती दाखवण्याचे दुर्दैवी काम करू नये. हिंदुत्वाला आव्हान देण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याला जशास तसे उत्तर देऊ, अशी चेतावणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. धर्मांध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये ‘आम्ही मुसलमान २० कोटी आहोत. आवश्यकता पडल्यास हिंदूंशी लढा देऊ’, असे विखारी वक्तव्य केले. त्यावर प्रवीण दरेकर यांनी शाह यांना वरील उत्तर दिले आहे.
“राष्ट्रवादाची भूमिका घेऊन बोलायचे आहे की २० कोटींचा आकडा सांगून देशाला धमकाविण्याचा प्रयत्न करायचा आहे, याचे स्पष्टीकरण नसीरुद्दीन शाह यांनी द्यावे. नसीरुद्दीन शाह यांनी “मुघल हे राष्ट्रनिर्माते होते” असे बोलणे म्हणजे अकलेचे तारे तोडण्यासारखे आहे.”#naseeruddinshah pic.twitter.com/Y00gabpLBu
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 30, 2021