हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्या आणि धर्मप्रेमी महिला यांनी १६ मंदिरांत लावली प्रबोधनपर भित्तीपत्रके !
हिंदु जनजागृती समितीची संस्कृती रक्षण मोहीम !
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ३० डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंनी त्यांचे नवीन वर्ष १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्यालाच साजरे करावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कोल्हापूर येथील कार्यकर्त्या कु. महिमा काब्रा आणि सौ. विमल काब्रा यांनी धर्मप्रेमी महिलांच्या साहाय्याने १६ मंदिरांमध्ये ३१ डिसेंबरच्या निमित्ताने प्रबोधन करणारी भित्तीपत्रके लावली. या पत्रकांमुळे मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांपर्यंत हा विषय पोचण्यास साहाय्य झाले. या प्रकारे ४ मंदिरांमध्ये फलक प्रसिद्धीद्वारेही हिंदूंपर्यंत हा विषय पोचवण्यात आला.