भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ७ सहस्र आधार कार्डमध्ये अवैधरित्या पालट आणि नवीन नोंदणी करणार्यांना अटक
इतक्या मोठ्या संख्येने अवैधरित्या पालट केले जात असतांना सरकारी अधिकार्यांना याची माहिती का मिळाली नाही ? – संपादक
भाग्यनगर (तेलंगाणा) – अवैधरित्या मिळवलेल्या नोंदणी अधिकारी ओळखपत्रावरून बनावट कागदपत्रे अपलोड करून ७ सहस्र अवैधरित्या कार्ड नोंदणी आणि माहिती यांत पालट केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. भाग्यनगरचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये नितेश सिंग याने आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी आणि त्याला ९० सहस्र रुपये देऊन आधार कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी पवन या मुख्य आरोपीकडून ६ ओळखपत्रे मिळवली. नितेशने आधार नोंदणीसाठी एक ओळखपत्र वापरले आणि आधार कार्ड अन् नवीन नावांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुस्तफा, जहांगीर आणि अन्वरुद्दीन यांना ५ ओळखपत्रे विकली. आरोपींनी गेल्या २ मासांमध्ये प्रत्येक ग्राहकाकडून २-३ सहस्र रुपये आकारून अवैधरित्या ७ सहस्र नवीन नोंदणी आणि सुधारणा केली.