नामजप करतांना हृदयस्थानी ज्योत अनुभवणे आणि ती आत्मज्योत असल्याचे जाणवून आज्ञाचक्र जागृत झाले असून अनाहतचक्र तेजतत्त्वाने भारित झाल्याचे जाणवणे
‘१७.६.२०२० या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी नामजप करण्यास आरंभ केला. ९.३५ वाजता मला माझ्या हृदयस्थानी पहिल्यांदाच एक ज्योत असल्याचे जाणवले. ही ज्योत ‘आत्मज्योतच आहे’, असे मला वाटले. ही ज्योत अनुभवत असतांना काही क्षण ‘माझे आज्ञाचक्र जागृत झाले असून अनाहतचक्र तेजतत्त्वाने भारित झाले आहे’, असे मला जाणवत होते. मी नमस्कारासाठी हात जोडल्यानंतर हात अनाहत चक्राजवळ गेल्यावर ‘तेजतत्त्वात आणखी भर पडत आहे’, असे मला वाटले. देहावरील वाईट शक्तींचे आवरण काढतांना बोटांमधून नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे माझ्या लक्षात आले.’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (१७.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |