आम्ही श्रीराममंदिर उभारत असल्याने मुसलमान आम्हाला मते देणार नाहीत ! – भाजपचे खासदार सुब्रत पाठक
आम्हालाही मुसलमानांची मते नकोत ! – सुब्रत पाठक
मुसलमान भाजपला यापूर्वीही मत देत नव्हते आणि पुढेही देण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपने हिंदूंच्या समस्या आणि धर्माविषयीची प्रकरणे मार्गी लावावीत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
कन्नौज (उत्तरप्रदेश) – मुसलमान आता आम्हाला मते देणार नाहीत; कारण आम्ही श्रीराममंदिर उभारत आहोत आणि कलम ३७० रहित केले आहे, असे विधान भाजपचे खासदार सुब्रत पाठक यांनी येथे एका जाहीर सभेमध्ये केले.
खासदार पाठक पुढे म्हणाले की,
१. आम्ही १०० घरे बांधली, तर त्यांतील ३० घरे मुसलमानांची असतील; मात्र असे असूनही आम्हाला ते मते देणार नाहीत; कारण चांगल्या गोष्टी केल्या, तरी ते विसरून,‘कलम ३७० रहित केले’, हेच ते लक्षात ठेवतात. याच कारणासाठी ते मते देणार नाहीत.
२. अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे, काशी-विश्वनाथ धामचेही लोकार्पण करण्यात आले. आता मथुरेची (तेथे भव्य मंदिर उभारण्याची) वेळ आली आहे.
#WATCH | We won’t get (Muslim) votes because we removed Article 370, built temples in Ayodha & Kashi & will build a temple in Mathura also. BJP doesn’t want votes of those who support terrorism, raise pro-Pak slogans & dream of Sharia law in India: BJP MP Subrat Pathak in Kannauj pic.twitter.com/JjCttAf1nz
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 29, 2021
आम्हाला आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांची मते नकोत !
ज्यांना मते द्यायची आहेत, ते देतील; मात्र भाजपला आतंकवादाचे समर्थन करणारे, पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणारे, तसेच भारतात शरीयत कायदा लागू करण्याची दिवास्वप्ने पहणार्यांची मते नकोच आहेत, असे पाठक यांनी ठामपणे सांगितले.