१५ मिनिटे काय १५ वर्षे दिली, तरी तुम्ही हिंदूंचे काहीही बिघडवू शकणार नाही ! – भाजपचे आमदार टी. राजासिंह यांची सूचक चेतावणी !
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पालघरमध्ये विराट हिंदु धर्मसभा
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंनाच धमकावले जाणे, हा हिंदूंच्या असंघटितपणाचा परिणाम ! संपादक
पालघर – अकबरुद्दीन ओवैसी यांना वेडेपणाचा झटका आला आहे. ते वारंवार ‘१५ मिनिटे १५ मिनिटे’ म्हणतात. अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवैसी हे दोघेही देशद्रोही आहेत. हे दोघे मिळून देशातील वातावरण बिघडवत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, अशी प्रक्षोभक भाषणे देणे बंद करा. १५ वर्षे दिली तरी तुम्ही हिंदूंचे काहीही बिघडवू शकणार नाही, असा घणाघात तेलंगाणातील भाजप आमदार आणि हिंदूंचे नेते श्री. टी. राजासिंह यांनी केला. पालघरमधील विराट हिंदु धर्मसभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
गीताजयंतीच्या निमित्ताने पालघरमध्ये विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी या सभेचे आयोजन केले होते. सभेला ३ सहस्र धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि हुतात्मा सी.डी.एस्. बिपीन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला आरंभ झाला. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुमार नागसेठ, जिल्हामंत्री सुशील शहा, संतोष जनाठे, बजरंग दल जिल्हा संयोजक चंदन सिंह, एस्.पी. सिंह उपस्थित होते.
टी. राजासिंह यांनी मांडलेली महत्त्वाची सूत्रे
१. गडचिंचले येथील साधूंच्या हत्येतील दोषींना विशेष न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी !
२. हिंदु धर्माविरोधात विष ओकणार्या मुन्नवर फारूकी यांसारख्या लोकांना धडा शिकवायला हवा !
३. आदिवासींना आमीष दाखवून आणि परदेशातून आलेल्या निधीच्या जोरावर त्यांचे धर्मांतर केले जात आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते गावोगावी अशा टोळ्यांना धडा शिकवतील आणि आम्हाला सोडून गेलेल्या लोकांना घरी परतायला लावतील.
४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे आज देश सुरक्षित आहे. तरुणांनी रा.स्व. संघ, विहिंप, बजरंग दल या संघटनांत सामील होऊन धर्माचा प्रसार करावा.
जिहाद्यांचा नायनाट होणे चालू राहील ! – मुकेश दुबे, विहिंप
हिंदुत्व हा आपला आत्मा आहे. भारत हा वीरांचा पवित्र देश आहे; ज्याने नेहमीच आक्रमकांचा आणि जिहाद्यांचा नायनाट केला आहे आणि ते चालू राहील.
टी. राजासिंह यांनी हिंदूंकडून करून घेतलेल्या प्रतिज्ञा !
सभेची सांगता करतांना टी. राजासिंह यांनी उपस्थित हिंदूंकडून प्रतिज्ञा म्हणून घेतल्या. त्यानंतर ‘भारतमाता की जय !‘, तसेच ‘हर हर महादेव !’ च्या गजरात उपस्थित सर्व हिंदूंनी भ्रमणभाषचे दिवे लावून त्याला अनुमोदन दिले !
- मी प्रतिज्ञा करतो, जोपर्यंत जगेन तोपर्यंत हिंदु म्हणून जगेन !
- मी जोपर्यंत जगेन तोपर्यंत माझ्या धर्माची, माझ्या समाजाची, माझ्या देशाची सेवा करीन !
- मी जोपर्यंत जगेन तोपर्यंत धर्मांतर असो, लव्ह जिहाद असो, आतंकवाद असो…या सर्वांना विरोध करत राहीन, नष्ट करत राहीन !
- मी जोपर्यंत जगेन तोपर्यंत १ रु. ची वस्तूसुद्धा जो गोमातेचा हत्यारा आहे, त्याच्याकडून विकत घेणार नाही !
- मी येथून भारताच्या प्रत्येक हिंदूला प्रार्थना करतो की, जो शपथ घेणारा आहे तो भारताचा हिंदू आहे !
- मी शपथ घेतो, येणार्या भविष्यात माझी जी लढाई होईल, ती अधर्माच्या नाशासाठी होईल !
सभेला उपस्थित वंदनीय !
१. श्री श्री १००८ श्री ऋषीजी महाराज, संजान आश्रम
२. परमहंस सागर महाराज, जुना आखाडा
३. प्रभु दामोदर दुलालदास, इस्कॉन टेम्पल
४. हेमादीदी, मां ब्रह्मकुमारी संस्थान