पाकिस्तान सरकारकडून पहिल्यांदाच हिंदूंच्या मंदिरांच्या देखभालीसाठी ‘हिंदु मंदिर व्यवस्थापन समिती’ची स्थापना
अशी समिती स्थापून पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवर जिहादी करत असलेली आक्रमणे बंद होणार आहेत का ? ‘आम्ही अल्पसंख्य हिंदूंसाठी काही तरी करतो’, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठीच पाक अशा समितीची स्थापना करत आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने ‘पाकिस्तान सिख गुरुद्वारा प्रबंधन समिती’च्या धर्तीवर ‘पाकिस्तान ‘हिंदु मंदिर व्यवस्थापन समिती’ची स्थापना केली आहे. पाक सरकारकडून अशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांच्या देखभालीसाठी प्रथमच अशा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीच्या पहिल्या उद्घाटन बैठकीच्या अध्यक्षस्थानी धार्मिक प्रकरणांचे मंत्री पीर नूर-उल-हक कादरी होते. या समितीमध्ये चंद चावला, हारून सरब दयाल, मोहनदास, नारंजन कुमार, मेघा अरोरा, अमित शदानी, अशोक कुमार, वर्सी मिल दीवानी आणि अमर नाथ रंधावा हे सदस्य असणार आहेत, तर अध्यक्ष कृष्णा शर्मा असणार आहेत.
पाकिस्तान में हिंदुओं के मंदिर की देखभाल के लिए प्रबंधन समिति का गठनhttps://t.co/WiwURSGwKK
— AajTak (@aajtak) December 30, 2021