अयोध्या आणि काशी येथे भव्य मंदिर उभारले जात असतांना मथुरा आणि वृंदावन मागे कसे राहील ? – योगी आदित्यनाथ
काशी येथील काशी विश्वनाथाचे मुख्य मंदिर अद्याप मुक्त झालेले नाही आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवर ईदगाह मशीद उभी आहे. ही दोन्ही तीर्थक्षेत्रे मुक्त करून हिंदूंना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) – आम्ही म्हटले होते की, अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यास प्रारंभ केला जाईल. त्यानुसार आम्ही त्याच्या बांधकामास आरंभ केला आहे. काशीमध्येही काशी विश्वनाथ धाम भव्य स्वरूपात उभारण्यात आले. असे आहे तर मग मथुरा आणि वृंदावन कसे मागे राहील ? तेथेही भव्य काम करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही ‘बृज तीर्थ विकास परिषदे’ची स्थापना केली असून तेथील विकास कार्यांना गती देण्यास प्रारंभ केला आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे एका सभेमध्ये केले.
आज अयोध्या में भगवान श्रीराम के भव्य मंदिर का निर्माण कार्य चल रहा है
काशी में भगवान विश्वनाथ का धाम भी भव्य रूप से बन रहा है
…तो फिर मथुरा-वृंदावन कैसे छूट जाएगा
वहां पर भी काम भव्यता से आगे बढ़ चुका है: #UPCM श्री @myogiadityanath जी pic.twitter.com/Dm7lVyRbsO
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) December 29, 2021