५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिपळूण (रत्नागिरी) येथील कु. योगेश्वर ओंकार जरळी (वय ९ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी (३१.१२.२०२१) या दिवशी कु. योगेश्वर ओंकार जरळी याचा ९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याचे आई-वडील आणि एक साधक यांना जाणवलेली त्याची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१७ मध्ये कु. योगेश्वर जरळी याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

कु. योगेश्वर जरळी

कु. योगेश्वर ओंकार जरळी याला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. डॉ. (सौ.) साधना जरळी (आई) आणि प्राध्यापक ओंकार जरळी (वडील), चिपळूण, रत्नागिरी.

१ अ. पूर्वसिद्धता करणे : कुठे गावी जायचे असल्यास तो स्वतःची बॅग १ दिवस आधीच भरण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हालाही त्याची आठवण करून देतो.

१ आ. उत्तम निरीक्षणक्षमता : आम्ही दोघे प्रवचन किंवा एखाद्या विषयाचा सराव करतांना ‘आमच्याकडून त्यातील कुठली सूत्रे रहात आहेत ?’, याचे निरीक्षण करून तो आम्हाला सांगतो.

१ इ. इतरांना साहाय्य करणे

१. मी सेवेत दिवसभर व्यस्त असते; परंतु त्याविषयी योगेश्वर कधी गार्‍हाणे करत नाही. उलट मला सेवेसाठी लागणार्‍या वस्तू तो मला न सांगता आणून देतो.

२. घरातही तो सांगेल, ते साहाय्य करतो. तो घरातील केर काढणे, ताक घुसळणे, पुरणयंत्रात पुरण बारीक करणे, सामान गोळा करून ठेवणे इत्यादी कामे कुठलेही आढेवेढे न घेता करतो.

३. मी कुडाळ सेवाकेंद्रात ५ दिवस सेवा करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्याने मला कुठलाही त्रास दिला नाही, उलट सेवेत सहकार्यच केले.

४. तो स्वतः स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत विविध स्वभावदोषांवर योग्य सूचना बनवतो आणि घरातील सर्वांना सूचना बनवण्यास साहाय्य करतो.

प्राध्यापक ओंकार जरळी

१ ई. ‘तो सतत आनंदी, उत्साही आणि शिकण्याच्या स्थितीत असतो.

१ उ. सत्संगाचे गांभीर्य

१. आमचा ‘ऑनलाईन’ सत्संग चालू असतांना तो लगेच सर्वांना सांगतो, ‘‘मोठ्याने बोलू नका. आईचा सत्संग चालू आहे.’’ तो त्या खोलीचे दार लावून घेतो. त्या वेळी खेळतांना तो आवाज करत नाही किंवा इतरांशी बोलतांनाही हळू आवाजात बोलतो. ‘सत्संगामध्ये व्यत्यय येऊ नये’, यासाठी तो जाणीवपूर्वक प्रयत्न करतो अन् इतरांनाही त्याची जाणीव करून देतो.

२. तो खेळत असला, तरीही सत्संगामध्ये चालू असलेला विषय तो मन लावून ऐकतो. सत्संगात एखाद्या विषयावर प्रश्नोत्तरे चालू असली, तर त्या प्रश्नाचे ‘आध्यात्मिकदृष्ट्या उत्तर कसे असावे ?’, याविषयी तो स्वतःचे मत मनमोकळेपणाने आणि आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवून सांगण्याचा प्रयत्न करतो.

१ ऊ. देवाची आवड : तो देवपूजेसाठी फुले आणून मनोभावे देवपूजा करतो आणि आनंदाने देवघर सजवतो.

१ ए. योगेश्वरमध्ये जाणवलेले पालट

१ ए १. इतरांशी जुळवून घेता येणे : पूर्वी योगेश्वरला अन्य मुलांशी जुळवून घ्यायला जमायचे नाही. आता त्याला ते जमू लागले आहे.

१ ऐ. स्वभावदोष : अनावश्यक बोलणे, हट्टीपणा आणि राग येणे.’

डॉ. (सौ.) साधना जरळी

२. श्री. महेंद्र चाळके यांना योगेश्वरची जाणवलेली वैशिष्ट्ये

अ. ‘योगेश्वर पूर्वी माझे म्हणणे ऐकून घ्यायचा नाही. आता मी कुठलेही काम सांगितले किंवा काही सांगितले, तरी तो लगेच ऐकतो.

आ. तो घरी आलेल्यांना न सांगता पाणी आणि खायला आणून देतो.

इ. तो कुठलीही कृती करतांना त्याविषयी अभ्यास करून, मन लावून आणि विचारपूर्वक करतो.’

(५.१.२०२०)

कु. योगेश्वर जरळी (वय ८ वर्षे) याने स्वभावदोष निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेल्या अनुभूती

१. स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत मनाला दिलेल्या स्वयंसूचना

अ. ‘नामजप करतांना माझ्या मनात खेळाचे विचार येत असतील, तेव्हा मी मनाचे न ऐकता नामजप करीन.

आ. आजी मला काही बोलली, तरी मी तिच्यावर न रागावता मी त्याविषयी बाबांशी बोलेन आणि ते सांगतील, ते ऐकीन.

२. मनाला दिलेले दृष्टीकोन आणि देवाचे घेतलेले साहाय्य

अ. आजीला राग आला, तर मी न रागावता तिला तिची चूक शांतपणे सांगीन.

आ. माझ्या मनात आलेला विचार मला समजत नसेल, तेव्हा मी देवाला विचारतो, ‘हा तुझा विचार आहे का ?’

३. मनात वस्तूंविषयी निर्माण झालेला भाव

अ. सर्व वस्तूंकडे पहातांना ‘त्यांच्यात देवतेचे तत्त्व आहे. आपण त्यांना पाय का लावतो ? पाय लागल्यास त्यांची क्षमा मागायला हवी’, असे मला वाटते आणि मी लगेचच त्यांची क्षमा मागतो.

आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ पहातांना मला छान वाटून ‘त्याच्याकडे बघतच रहावे’, असे वाटते.

४. अनुभूती

४ अ. नारळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाचा नामजप करतांना स्वतःभोवती नामजपाचे कवच सिद्ध होणे आणि भगवान शिवावर कविता सुचणे : नारळी पौर्णिमेच्या दिवशी मी शिवाची मानसपूजा केली. तेव्हा ‘साक्षात् भगवान शिव समोर येऊन बसला आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी शिवाचा नामजप करत असतांना मला कविता सुचली आणि ‘साक्षात् भगवान शिव माझ्याभोवती त्याच्या नामजपाचे कवच सिद्ध करत आहे आणि मी ते अनुभवत आहे’, असे मला जाणवले.

जय जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ ।

भोलेनाथ आहात तुम्ही सगळीकडे हो ।
भोलेनाथ, भोलेनाथ, भोलेनाथ, भोलेनाथ ।। १ ।।

जिथे बघू, तिथे दिसत आहात तुम्ही हो ।
रक्तात अन् थेंबाथेंबात आहात तुम्ही शिवदेव ।। २ ।।

रक्ताची जाणीवही नाही होत मला ।
जय जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ ।। ३ ।।

४ आ. मनात आलेल्या इच्छा देवता त्वरित पूर्ण करत असल्याचे जाणवणे

१. एकदा मला ‘माझ्या पलंगाच्या भोवती संपूर्ण कवच सिद्ध होऊदे’, अशी इच्छा झाली. तेव्हा लगेच मला ‘माझ्या संपूर्ण शरिराभोवती कवच सिद्ध होत आहे’, असे जाणवले.

२. मला कुठे जल दिसले की, गंगादेवीची आठवण येते. क्षणार्धात ती माझ्यासमोर येऊन माझ्याशी बोलते.

३. रात्री झोपतांना माझ्या मनात ‘कुठल्यातरी देवतेशी बोलावे’, अशी इच्छा होते. तेव्हा मी ब्रह्मा, श्रीविष्णु किंवा शिव यांच्यातील कुणाची आठवण करतो. त्या देवता येऊन सूक्ष्मातून माझ्याशी बोलतात.

अशा वेळी माझ्या मनात दुसरा वेगळा विचार आला, तर तो मला नकोसा वाटतो आणि मी त्या वाईट विचाराला फेकून देतो.

४. रुद्राक्ष माळेकडे पाहिले की, लगेच मला ‘नामजप करावा’, असे वाटते. भरपूर नामजप झाला की, मला फार छान वाटते. मला ‘नामजपच करत रहावे, थांबूच नये’, असे मनातून वाटते.

५. कृष्णाचे छायाचित्र पाहिले की, मला सुदर्शनचक्र दिसते आणि त्याच्याशी बोलण्याची इच्छा निर्माण होते. मी त्याच्याशी बोलतो. त्याला हात लावला की, माझ्या हाताला चैतन्य मिळते. सगळीकडे चैतन्यच चैतन्य येते. श्रीकृष्ण मला म्हणतो, ‘आम्ही भक्ताचे सेवक आहोत !’

६. एकदा मी वरुणदेवाला सांगितले, ‘हे वरुणदेवा, तू सर्व शेतकर्‍यांना पाणी देतोस. चांगले आहे; पण मला अजून देवाची पूजा करण्यासाठी फुले आणायची आहेत. तू थोडा वेळ थांब ना !’ तेव्हा लगेच पाऊस न्यून झाला. मी फुले आणेपर्यंत पाऊस थांबला आणि नंतर परत चालू झाला.’

– कु. योगेश्वर ओंकार जरळी, चिपळूण, रत्नागिरी. (५.१.२०२०)